नवी दिल्लीः देशातील आयआयटी व इंजिनीअरिंग महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन जानेवारी 2019 आणि जेईई मेन एप्रिल 2019 परीक्षेच्या सर्वोत्तम गुणांच्या आधारावर रँकिंग जारी केलं आहे. यात दिल्लीतला शुभम श्रीवास्तव टॉपर राहिला आहे. तर कर्नाटकातील केविन मार्टिन दुसरा, मध्य प्रदेशातील ध्रुव अरोडा तिसरा, पंजाबमधील जयेश सिंगला चौथ्या स्थानी आहे. त्यानंतर टॉपर राहिलेल्या शुभम श्रीवास्तवनंही यशाचं रहस्य उलघडलं आहे.तो म्हणाला, मी कधीही विचार केला नव्हता की, सहज दिलेल्या या परीक्षेत टॉप करेन. आता माझा उद्देश जेईई अॅडवान्समध्ये चांगलं रँकिंग आणून दिल्ली किंवा मुंबईतल्या आयआयटीतून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक करण्याचा आहे. कॉम्प्युटर सायन्स हा माझ्या आवडीचा विषय आहे. जेईई परीक्षेची तयारी मी 10वीनंतर सुरू केली आहे. 11वीमध्ये त्यांनी एक कोचिंग क्लास ज्वॉइन केलं होतं. कोचिंग क्लासमधून आल्यानंतर तो दररोज तीन तास अभ्यास करायचा. जेईई मेन्स आणि सीबीएसईचा अभ्यास जवळपास सारखाच आहे. दोन्ही अभ्यासक्रमात जास्त प्रश्न हे एनसीईआरटीसंदर्भात विचारण्यात आले आहेत. अशातच त्याला 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करण्यात कोणतीही अडचण नाही. मी जास्त वेळ केमिस्ट्रीला दिली आहे.अभ्यासादरम्यान ते मध्ये मध्ये बुद्धिबळही खेळतात. तसेच त्याला क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळणंही आवडतं. क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर त्याला आवडतात. वेळ मिळाल्यास भारताचे सामने बघत असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. तसेच मी आयपीएलही पाहतो, असंही तो म्हणाला आहे. शुभमचे वडील अनुप कुमार हे आयआयटीयन आहेत. ते एअर इंडियामध्ये कामाला होते. त्याची आई रुची या गृहिणी आहेत. तर बहीण ट्रिपल आयटीतून बीटेक करत आहे.
रोज तीन तास अभ्यास अन् बहिणीसोबत बुद्धिबळ... दिल्लीचा शुभम बनला JEE टॉपर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 11:12 AM