पाटणा - बिहारच्या राजकारणाचे केंद्र मानले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव सध्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे गेल्या चार दशकांनंतर प्रथमच बिहारमधील निवडणुकीच्या प्रचारामध्ये लालूप्रसाद यादव यांचा सहभाग दिसणार नाही. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या त्यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी आपल्या मनातील व्यथा कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे. एकीकडे लालूप्रसाद यादव हे कारावासाची शिक्षा भोगत आहेत. तर दुसरीकडे लालूंच्या दोन्हीं मुलांमध्ये पक्षातील वर्चस्वावरून लढाई सुरू झाली आहे. लालूंचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यांनी धाकट्या भावाविरोधात विरोधाचा बिगुल फुंकला आहे. त्यामुळे राबडीदेवी व्यथित झाल्या आहेत. कौटुंबिक कलहाच्या वेळी लालूंच्या अनुपस्थितीमुळे दु:खी झालेल्या राबडी देवी यांनी 'जीवन में लालू हैं, कण-कण में लालू हैं,' अशा आशयाची कविता रचली आहे.
'जीवन में लालू हैं, कण-कण में लालू हैं,' विरहाने व्याकूळ राबडीदेवींनी रचली कविता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 5:14 PM