मुंबई, दि. 7 - विमान कंपन्यांमधील स्पर्धेमुळे देशातंर्गत हवाई प्रवास आता सर्वसामान्यांच्या अवाक्यात आला आहे. जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी वर्षभर या विमान कंपन्या वेगवेगळया ऑफर्स देत असतात. आता टाटा-एसआयए यांच्या संयुक्त भागीदारीतून आकाराला आलेल्या विस्तारा विमान कंपनीने स्वस्त हवाई प्रवासाची ऑफर जाहीर केली आहे.
विस्ताराने 'फ्रीडम टू फ्लाय' या ऑफरअंतर्गत हवाई तिकिटावर घसघशीत डिस्काऊंट दिला आहे. या योजनेमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट 799 रुपये तर, प्रिमियम इकॉनॉमी वर्गाचे तिकीट 2,099 रुपये आहे. मर्यादीत कालावधीसाठी ही ऑफर आहे. आज मध्यरात्रीपासून 9 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रवाशांना तिकीट बुक करता येईल. या ऑफरमध्ये 23 ऑगस्ट 2017 ते 19 एप्रिल 2018 या कालावधीसाठी तिकीट बुकिंग करता येईल.
या ऑफरमुळे प्रवाशांना गोवा, पोर्ट ब्लेअर, लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, कोच्ची, गुवहाटी, अमृतसर आणि भुवनेश्वर या पर्यटनस्थळी जाण्याचा अॅडव्हान्स प्लान करण्याची संधी आहे. या ऑफर अंतर्गत दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या मेट्रो शहरांचा सुद्धा प्रवास करता येईल.
ऑफरतंर्गत श्रीनगर-जम्मू रुटवर सर्वात स्वस्त 799 रुपयांचे तिकीट उपलब्ध आहे. त्याशिवाय दिल्ली-अमृतसर, दिल्ली-चंदीगड मार्गावर तुम्ही अनुक्रमे 1,199 आणि 1,299 रुपयात तुम्ही प्रवास करु शकता. दिल्ली-श्रीनगर आणि दिल्ली-अहमदाबाद मार्गावर 1,499 रुपयात तिकीट बुक करु शकता.
मागच्या महिन्यात एअर इंडियाची होती ऑफरमागच्या महिन्यात एअर इंडियाने सर्वात स्वस्त 706 रुपयात हवाई प्रवासाची ऑफर दिली होती. एअर इंडियाने मान्सून ऑफरमध्ये देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट अवघ्या 706 रुपयांपासून उपलब्ध होते. एअर इंडियाची ही ऑफर 1 जुलै ते 20 सप्टेंबर या कालावधीसाठी होती. त्यासाठी 17 जून ते 21 जून दरम्यान तिकीट बुक करावं लागणार होतं. एअर इंडियाचं बुकिंग ऑफिस, अधिकृत ट्रॅव्हल्स एजंट वेबसाइट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून तिकीट बूक केलेल्यांना या ऑफरचा लाभ घेता आला. ठरावीक शहरांमधील प्रवासासाठीच ही ऑफर होती.