नवी दिल्ली : १९८९ सालच्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. त्या पक्षाला सर्वाधिक म्हणजे १९७ जागा मिळाल्या होत्या. पण राजीव गांधी यांनी आम्ही सरकार स्थापन करणार नाही, अशी भूमिका घेतली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जनता दलाला १४३ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला ८५. दुसºया क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी जनता दलाने सरकार स्थापनेचा दावा केला. चंद्रशेखर जनता दलाचे अध्यक्ष होते. पंतप्रधानपदासाठी व्ही. पी. सिंग यांचे नाव सर्वात पुढे होते. पण चंद्रशेखर हेही शर्यतीत होते. त्यांनी माघार घ्यावी, असे प्रयत्न अनेक नेते करीत होते.
अॅड. राम जेठमलानी यांनी चंद्रशेखर यांच्या साऊ थ अॅव्हेन्यूतील घराबाहेर धरणे धरले. चंद्रशेखर यांनी माघार घ्यावी, अशी त्यांचीही मागणी होती. पण चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी तिथे जेठमलानी यांना बदडूनच काढले. ते कळताच जनता दलाचे काही नेते तिथे आले. त्यांनी जेठमलानी यांना तेथून दूर नेले. जनता दलाच्या बैठकीत व्ही. पी. सिंग यांच्या नेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.
लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवताच, सिंग सरकारचा पाठिंबा भाजपने पाठिंबा काढून घेतला. मग चंद्रशेखर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपद भूषविले. काँग्रेसने काही महिन्यांतच त्यांचा पाठिंबा काढून घेतला.