प्रवाशांच्या बॅगेतून दागिने, पैसे चोरणारे तिघे गजाआड
By admin | Published: February 29, 2016 10:01 PM
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवाशांच्या बॅगेतून दागिने व पैसे चोरणार्या तीन भामट्यांना गजाआड केले आहे. अटकेनंतर झालेल्या ओळख परेडमध्ये त्यांचे कारनामे समोर आलेले असून त्यांनी जळगाव शहरातील रामानंदनगर, औद्योगिक वसाहत व शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवाशांच्या बॅगेतून दागिने व पैसे चोरणार्या तीन भामट्यांना गजाआड केले आहे. अटकेनंतर झालेल्या ओळख परेडमध्ये त्यांचे कारनामे समोर आलेले असून त्यांनी जळगाव शहरातील रामानंदनगर, औद्योगिक वसाहत व शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.गुलाब रतन सूर्यवंशी (वय ३५), पृथ्वीराज अमृत सूर्यवंशी (वय १९) दोघे रा.सतमाणे, ता.साक्री, जि.धुळे व दीपक भावलाल सोनवणे (वय ३६, रा.सदननगर, लासलगाव, ता.निफाड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी जळगावातील नवीन बसस्थानक ते एम.जे. कॉलेज दरम्यान, रिक्षातून प्रवास करणार्या महिलेच्या बॅगेतून १० हजार ४०० रुपये रोख व साडेचार हजारांचा मोबाइल चोरीस गेला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरही औद्योगिक वसाहत व शहर पोलीस ठाण्यातही अशा स्वरुपाचे गुन्हे घडले होते. गुन्ांच्या पद्धतीवरून चोरट्यांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी पोलीस उपनिरीक्षक नीता मांडवे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नुरोद्दीन शेख हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील, पोलीस नाईक शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, प्रकाश महाजन, रवींद्र गायकवाड, रवी चौधरी व दर्शन ढाकणे यांचे पथक तपास कामासाठी तयार केले होते. हे पथक तपासावर असताना १२ फेबु्रवारीला रात्रीच्या सुमारास एम.जे. कॉलेज चौफुलीजवळ एका रिक्षातून वरील तिघे आरोपी संशयितरित्या फिरत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील मोबाइल आढळला. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीच्या इतर गुन्ांची माहिती दिली. गुन्ात वापरलेल्या रिक्षावर त्यांनी बनावट क्रमांक टाकल्याचेही त्यांनी कबूल केले.अन्य गुन्ांतील मुद्देमालाची रिकव्हरीया चोरट्यांकडून रामानंदनगर, औद्योगिक वसाहत व शहर पोलीस ठाण्यात दाखल अन्य चोरीच्या गुन्ांतील मुद्देमालाचीदेखील रिकव्हरी करण्यात आली आहे. त्यांनी जळगाव शहरात विविध ठिकाणी चोरी केलेली आहे.