मंदिरात चोरट्यांनी केले दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2016 2:21 AM
नागपूर : गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने झालेल्या गर्दीचा लाभ उठवत चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले. सीताबर्डी आणि प्रतापनगरातील श्री गजानन महाराज मंदिरात या घटना घडल्या.
नागपूर : गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने झालेल्या गर्दीचा लाभ उठवत चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले. सीताबर्डी आणि प्रतापनगरातील श्री गजानन महाराज मंदिरात या घटना घडल्या. विनीता विजय दीक्षित (वय ६०, रा. आशीर्वाद अपार्टमेंट, गिरीपेठ, नागपूर) या आज दुपारी १ वाजता श्री गजानन महाराज मंदिर झेंडा चौक, धरमपेठ येथे दर्शनाकरिता गेल्या होत्या. मंदिरातील महिलांच्या रांगेत गर्दी झाल्याची संधी साधून चोरट्याने बेमालूमपणे दीक्षित यांच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. अशाच प्रकारे आज दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान पुष्पलता विजयराव देशमुख (वय ७१, रा. शहाणे लेआऊट, त्रिमूर्तीनगर) या भागवत सप्ताह निमित्ताने त्रिमूर्तीनगरातील भगवती सभागृहात आयोजित श्री गजानन महाराज यांचा महाप्रसाद घेण्याकरिता गेल्या होत्या. पेन्डॉलमध्ये झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले. या दोन्ही प्रकरणात अनुक्रमे सीताबर्डी आणि प्रतापनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. ---