शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 7:51 AM

Jhansi Hospital Fire : या आगीत दहा मुलांचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. 

उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU)  शुक्रवारी (दि.१५) भीषण आग लागली. या आगीत दहा मुलांचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली.

अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जखमी मुलांवर उपचार सुरू असून आर्थिक मदत करण्यासही सरकार तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले, "नवजात बालकांचा मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी आहे. कुटुंबीयांसोबत आम्ही नवजात बालकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्राथमिक तपास प्रशासकीय पातळीवर केला जाईल, जो आरोग्य विभाग करेल, त्यानंतर पोलीस चौकशी करणार आहेत. यामध्ये अग्निशमन विभागाची टीमही सहभागी होणार आहे. तर तिसरी चौकशी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत."

एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुलं दाखल होती - सीएमएस या घटनेची माहिती देताना झाशीचे सीएमएस सचिन मेहर म्हणाले की, महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुलांना दाखल करण्यात आले होते. अचानक आग लागली, जी विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, बहुतांश मुले ऑक्सिजनच्या आधारावर असल्याने आग वेगाने पसरली. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता ही घटना घडली.

मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःखझाशी दुर्घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. "झाशी जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजच्या NICU मध्ये झालेल्या घटनेत मुलांचा मृत्यू अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृतांच्या आत्म्यांना मोक्ष आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी भगवान श्री रामाकडे प्रार्थना करतो."

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटलUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ