भाजपाला मोठा धक्का; महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडची सत्ताही जाण्याच्या मार्गावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 11:48 AM2019-12-23T11:48:19+5:302019-12-23T11:49:04+5:30

जेएमएम-काँग्रेस-राजदचा विजय जवळपास निश्चित

Jharkhand assembly election 2019 Clear majority in sight for jmm congress rjd big blow to bjp | भाजपाला मोठा धक्का; महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडची सत्ताही जाण्याच्या मार्गावर!

भाजपाला मोठा धक्का; महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडची सत्ताही जाण्याच्या मार्गावर!

Next

रांची: महाराष्ट्रात मोठा पक्ष ठरुनही सत्तेपासून दूर राहावं लागल्यानंतर आता झारखंडमध्येहीभाजपावर तीच वेळ ओढवली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होत असून भाजपाला सत्ता गमवावी लागणार असल्याची दाट शक्यता आहे. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या भाजपा २८ जागांवर पुढे आहे. 

एका बाजूला भाजपा पिछाडीवर असताना दुसऱ्या बाजूला झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीनं ४१ जागांचा टप्पा गाठला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा २३, काँग्रेस १३, तर राष्ट्रीय जनता दल ५ जागांवर आघाडीवर आहे. झारखंड मुक्ती मोर्चानं ४ आणि आजसूनं ३ जागांवर आघाडी घेतली आहे. आजसू आणि भाजपा एकत्र सत्तेत होते. मात्र निवडणुकीपूर्वी त्यांची आघाडी तुटली. याचा काहीसा फटका दोन्ही पक्षांना बसताना दिसत आहे. 

२०१४ मध्ये भाजपानं ३७ जागा जिंकत आजसूसोबत सरकार स्थापन केलं. मात्र यंदा भाजपानं स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपाला जवळपास ३४ टक्के जनतेनं कौल दिला आहे. मात्र झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद महाआघाडी ४१ जागांवर पुढे असल्यानं राज्यातील भाजपाची सत्ता जाणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. पाच टप्प्यातलं मतदान संपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोल्सनी भाजपाला सत्ता गमवावी लागणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. 
 

Web Title: Jharkhand assembly election 2019 Clear majority in sight for jmm congress rjd big blow to bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.