मोठा खेला होणार...? काँग्रेस-JMM चे एवढे आमदार भाजपच्या संपर्कात, हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 10:32 PM2024-09-09T22:32:55+5:302024-09-09T22:33:50+5:30
काँग्रेस आणि जेएमएमचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे...
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच राज्य भाजपचे निवडणूक सहप्रभारी तथा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस आणि जेएमएमचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
...पण आम्ही सर्वांना पक्षात घेऊ शकत नाही -
झारखंड भाजपचे निवडणूक सह-प्रभारी हिमंता बिस्वा सरमा सोमवारी (9 सप्टेंबर) रांचीत होते. ते म्हणाले, "काँग्रेसचे 12 ते 14 आमदार आणि जेएमएमचे दोन ते तीन आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण आम्ही सर्वांना पक्षात घेऊ शकत नाही. कारण आमच्या पक्षातील कार्यकर्त्ये नाराज होतील."
झारखंड निवडणुकीत भाजपचा विजय होणार - हिमंत बिस्वा सरमा
सरमा पुढे म्हणाले, “आमचा पक्ष झारखंडमध्ये निवडणूक जिंकणार आहे. पक्षाच्या नेत्यांनी सर्व जागांवर निवडणुकीची तयारी केली आहे. अशा स्थितीत आम्ही काँग्रेस आणि जेएमएमच्या आमदारांना आमच्या पक्षात घेतले, तर आमच्या पक्षाचे नेते मलाच मारतील."
झारखंड मुक्ती मोर्चासोबत (JMM) सुमारे साडेचार दशकांचा राजकीय प्रवास संपवून, राज्याचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी 30 ऑगस्ट रोजी औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.