झारखंडमधीलकाँग्रेसच्या (Congress) तीन आमदरांकडून पश्चिम बंगालमधील (West Bengal) हावडा येथे मोठ्या प्रमाणावर कॅश जप्त करण्यात आली होती. या तीनही आमदरारांना काँग्रेसने रविवारी निलंबित केले. तसेच पोलिसांनीही या आमदारांना अटक केली आहे. दीर्घ चौकशीनंतर, पोलिसांनी त्यांना अटक केली. महत्वाचे म्हणजे, हे तीन आमदार पकडले गेल्यानंतर, काँग्रेसने भाजपवर झारखंडमधील त्यांचे झारखंड मुक्ती मोर्चासोबत (JMM) असलेले आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता.
काँग्रेसने तीन आमदारांना केलं निलंबित -यासंदर्भात, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संबंधित तीनही आमदारांना तत्काळ निलंबित केले आहे, अशी माहिती काँग्रेसचे झारखंड प्रभारी अविनाश पांडे यांनी दिली आहे. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
कारमधून हस्तगत करण्यात आली होती कॅश - विशेष माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी शनिवारी एक एसयूव्ही रोखली होती. यात हावडाच्या रानीहाटीमधील काँग्रेस आमदार इरफान अंसारी, राजेश कच्छप आणि नमन बिक्सल कोंगारी होते. नॅशनल हायवे-16 वरवर ही कारवाई करण्यात आली. या गाडीत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली होती.
आणखी दोन लोक होते कारमध्ये -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित एसयूव्हीमध्ये आमदारांशीवाय दोन इतर लोकही उपस्थित होते. या कारच्या एका बोर्डवर काँग्रेसच्या निवडणूक चिन्हासह, ‘आमदार जामताडा झारखंड’, असे लिहिण्यात आलेले होते. इरफान अंसारी जामताडा, तर राजेश कच्छप रांची जिल्ह्यातील खिजरी आणि बिक्सल कोंगारी सिमडेगा कोलेबिरा येथील आमदार आहेत.