रांची : झारखंडविधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (झामुम) व काँग्रेस आघाडीची सरशी होत असल्याचे चित्र दिसू लागताच आनंद झालेल्या काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर फटाके फोडले व मिठाई वाटली. राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले होते.
झारखंडमध्ये लोकांना बदल हवा होता. त्यासाठी तेथील जनतेने मतदान केले असे काँग्रेसचे प्रवक्ते प्रणव झा यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. निकाल जाहीर होत असताना रांचीतील काँग्रेस, झामुम, दिल्लीतील काँग्रेसचे मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
पराभव माझा : दासझामुम व काँग्रेस आघाडीला बहुमत मिळणार असे चित्र दिसू लागताच भाजपचे रांचीतील पक्षकार्यालय, दिल्लीतील भाजप मुख्यालय येथील पक्षकार्यकर्त्यांची गर्दी ओसरू लागली. मुख्यमंत्री रघुबर दास निकाल लागू लागले तेव्हा खुश्ीत होते आणि आमचा आनंद नक्की असे सांगत होते. नंतर चित्र पालटताच त्यांनी हा पराभव भाजपचा नसून, माझ्या स्वत:चा आहे, असे जाहीर करून टाकले. (वृत्तसंस्था)झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल येत असताना झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन हे रांचीमधील आपल्या निवासस्थानी कुटुंबियासोबत रमले होते. वडील आणि पक्षाचे प्रमुख शिबू सोरेन आणि आई रिपू सोरेन यांच्यासह सोेमवारी टिपलेले हे छायाचित्र.