झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 08:09 PM2024-11-20T20:09:08+5:302024-11-20T20:09:34+5:30

Jharkhand Exit Poll LIVE: तीन मोठ्या एक्झिट पोलच्या निकालांनुसार, झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचे सरकार स्थापन होताना दिसत आहे.

Jharkhand Exit Poll LIVE: Shock for India's lead in Jharkhand; NDA clear majority in Exit Poll | झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज

झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज


Jharkhand Exit Poll : झारखंडमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले असून, त्यानंतर एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. MATRIZE च्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असून, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडी सरकार स्थापन होणार आहे.

MATRIZE एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडी झारखंडमधील विधानसभेच्या 81 पैकी 46 जागा काबीज करणार आहे. तर, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. 6 जागा इतर पक्षांकडे जाण्याची शक्यता आहे.

चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 45 ते 50 जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला 35 ते 38 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 3 ते 5 जागा मिळू शकतात.

JVC एक्झिट पोलनुसार, इंडिया आघाडीवर असलेल्या NDA आघाडीला राज्यात 42 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, इंडिया आघाडीला येथे 38 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. 

निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार

झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले असून, त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबरला 43 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला 38 जागांवर मतदान झाले. आता 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात पूर्वीपेक्षा जास्त मतदान
झारखंडमध्ये 20 नोव्हेंबरला म्हणजेच आजच दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांवर मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 67.59 टक्के मतदान झाले आहे. 13 नोव्हेंबर रोजी येथे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 43 जागांवर मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 66.18% पेक्षा जास्त मतदान झाले. 

Web Title: Jharkhand Exit Poll LIVE: Shock for India's lead in Jharkhand; NDA clear majority in Exit Poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.