Jharkhand Hemant Soren (Marathi News): झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची दुपारपासून ED चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानी हालचाल वाढली आहे. डीजीपी आणि मुख्य सचिव निवासस्थानी पोहोचले असून, रांचीमध्ये कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत वाढवण्यात आली आहे.
सुरक्षेत वाढसीएम हाऊस, राजभवन आणि ईडी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात पुढील आदेश येईपर्यंत कलम 144 लागू राहील. राजभवनाबाहेर सुरक्षादेखील वाढवण्यात आली आहे. यातच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन टुरिस्ट बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे, हेमंत सरकार आपल्या आमदारांना दुसरीकडे हलवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय प्रकरण?जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाची टीम सीएम सोरेन यांची चौकशी करत आहे. तपास यंत्रणा सीएम सोरेन यांची दुसऱ्यांदा चौकशी करत आहे. यापूर्वी 20 जानेवारी रोजी ईडीने त्यांची चौकशी केली होती. ईडीच्या चौकशीदरम्यान रांचीमध्ये जेएमएम समर्थकांचे निदर्शन सुरू आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे अधिकारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान, हेमंत सोरेन यांनी एसटी-एससी पोलिस ठाण्यात ईडी अधिकाऱ्यांविरुद्धच एफआयआर दाखल केला. हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर दिल्लीपासून रांचीपर्यंत छळ केल्याचा आरोप केला आहे.