शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

हेमंत सोरेन यांना 6 महिन्यांनंतर जामीन; पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 4:17 PM

झारखंडमध्ये आज पक्षाची बैठक झाली, ज्यात हेमंत सोरेन यांच्या नावावर एकमत झाले.

Hemant Soren Jharkhand : मनी लाँड्रिंगप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) कार्याध्यक्ष हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना 28 जून रोजी जामीन मंजूर झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता त्यांना परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. बुधवारी(दि.3) राज्यात इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये सोरेन यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यावर एकमत झाले. आता लवकरच ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही पहिलीच औपचारिक बैठक आहे. या बैठकीला सर्व आमदारांना येण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, झारखंडचे राज्यपाल सध्या राज्याबाहेर आहेत, त्यामुळे राज्यपाल रांचीला पोहोचेपर्यंत सर्व आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहतील. राज्यपाल सायंकाळी रांची येतील आणि त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना नवी जबाबदारी दिली जाऊ शकते. 

सीएम चंपाई सोरेन यांनी सर्व कार्यक्रम रद्द केलेहेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना तेव्हा बळ मिळाले, जेव्हा मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी अखेरच्या क्षणी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून बैठकीला हजेरी लावली. सोरेन कालपासून त्यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांना भेटायला आलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्याचा संदेश देऊन परत पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर, चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

टॅग्स :JharkhandझारखंडCourtन्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी