रांची - चारा घोटाळ्या प्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. त्यामुळे बऱ्याच काळापासून कारागृहात असलेल्या लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अन्य दोन प्रकरणात शिक्षा झालेली असल्याने त्यांनी सध्यातरी तुरुंगातच राहावे लागणार आहे. देवघर कोषागार प्रकऱणात शिक्षेचा अर्ध्याहून अधिक अवधी पूर्ण झाल्याचा आधार घेऊन लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना रांची उच्च न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या हमीवर त्यांचा जामीन मंजुर केला. मात्र लालूप्रसाद यादव यांनी आपला पारपोर्ट न्यायालयात जमा करावा, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना मिळाला जामीन, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 4:03 PM