गर्भवती पत्नीच्या परीक्षेसाठी पतीने 1176 KM चालवली स्कुटी, पेट्रोलसाठी दागिने ठेवले गहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 12:19 AM2020-09-04T00:19:40+5:302020-09-04T01:04:29+5:30

लॉकडाउनमुळे नोकरी गेल्याने धनंजय यांच्याकडे स्कुटीत पेट्रोल टाकायलाही पेसे नव्हते. अशात त्यांची पत्नी सोनी यांनी आपले दागिणे 10 हजार रुपयांसाठी गहाण ठेवले. या बदल्यात त्यांना दर महिन्याला 300 रुपये व्याज द्यावे लागणार आहे.

jharkhand husband drive 1176 km scooty for pregnant wife examination from godda to gwalior | गर्भवती पत्नीच्या परीक्षेसाठी पतीने 1176 KM चालवली स्कुटी, पेट्रोलसाठी दागिने ठेवले गहाण

गर्भवती पत्नीच्या परीक्षेसाठी पतीने 1176 KM चालवली स्कुटी, पेट्रोलसाठी दागिने ठेवले गहाण

Next
ठळक मुद्देलॉकडाउनमुळे नोकरी गेल्याने धनंजय यांच्याकडे स्कुटीत पेट्रोल टाकायलाही पेसे नव्हते.पत्नी सोनी यांनी आपले दागिणे 10 हजार रुपयांसाठी गहाण ठेवले आहेत. विशेष म्हणजे सोनी या 7 महिन्याच्या गर्भवती आहेत

ग्वाल्हेर - हिंमत आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कितीही मोठे आव्हान असो, ते छोटे वाटायला लागते. नव्हे अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते. काहीसा असाच पराक्रम केलाय, झारखंडमधील एका तरुणाने. या तरुणाचे नाव आहे, धनंजय मांझी. धनंजय मुळचे झारखंडमधील आहेत. मात्र त्यांची चर्चा संपूर्ण मध्य प्रदेशात सुरू आहे. कारण धनंजय यांनी गोड्डा येथून 1176 किलो मीटर अंतरावर असलेल्या ग्वाल्हेर येथे पत्नी सोनी यांना स्कुटीवरून परीक्षेसाठी आणले आहे. पत्नी सोनी हेम्ब्रम या डीएलएड द्वितीय वर्षाची परीक्षा देत आहेत. त्या 7 महिन्याच्या गर्भवती आहेत. सध्या ट्रेन सुरू नसल्याने आणि स्वतंत्र गाडी करून येण्यासारखी परिस्थिती नसल्याने ते स्कुटीने आले आहेत. 

परीक्षा सुटू नये, अशी पत्नीची इच्छा होती -
यावर बोलताना धनंजय यांनी सांगितले, "सध्या रेल्वे गाड्या बंद आहेत. त्यांच्याकडे इतर साधनही नाही. त्यांची आर्थिक परिस्थितीही एवढी चांगली नाही, की ते स्वतंत्र गाडी करू येऊ शकतील. यामुळे त्यांनी स्कुटीनेच गोड्डावरून 1176 किलो मीटरचा प्रवास करत ग्वाल्हेरला येण्याचे ठरवले. तसेच, परीक्षा सुटू नये, अशी पत्नीची इच्छा होती. डीएलएड करून तिची शिक्षक होण्याची इच्छा आहे, असेही धनंजय यांनी सांगितले.

धनंजय गुजरातमधील एका कंपनीत कूक म्हणून नोकरी करत होते -
धनंजय हे गुजरातमधील एका कंपनीत कूक म्हणून नोकरी करत होते. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांची नोकरी गेली. ते गेल्या 3 महिन्यांपासून घरीच आहेत. यामुळे त्यांनी बाजूला ठेवलेले पैसेही संपले आहेत. असेही धनंजय यांनी सांगितले.

पत्नी सोनी यांनी 10 हजार रुपयांसाठी गहाण ठेवले दागिणे -
लॉकडाउनमुळे नोकरी गेल्याने धनंजय यांच्याकडे स्कुटीत पेट्रोल टाकायलाही पेसे नव्हते. अशात त्यांची पत्नी सोनी यांनी आपले दागिणे 10 हजार रुपयांसाठी गहाण ठेवले. या बदल्यात त्यांना दर महिन्याला 300 रुपये व्याज द्यावे लागणार आहे. या जोडप्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना ग्वाल्हेर येथे येण्यासाठी आतापर्यंत 3500 रुपये एवढा खर्च आला. येथे राहण्यासाठी त्यांनी 1500 रुपयांची भाड्याची रूम घेतली आहे.

खासगी बसेसनी सांगितले होते अव्वाच्या सव्वा भाडे -
या प्रवासात धनंजय आणि त्यांच्या प्रत्नीला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला. धनंजय स्वतः 10वीदेखील उत्तीर्ण नाहीत. पण त्यांना शिक्षणाची किंमत ठाऊक आहे. धनंजय यांनी सांगितले, की ग्वाल्हेरला जाण्यासाठी त्यांनी काही खासगी बसेसना विचारणा केली. मात्र त्यांनी गोड्डा ते ग्वाल्हेर जाण्यासाठी प्रतिव्यक्ती 15 हजार रुपये लागतील, असे सांगितले. म्हणजे आम्हा दोघांना एकूण 30 हजार रुपये लागणार होते. तेवढे पैसे आमच्याकडे नव्हते. यानंतर त्यांनी रेल्वेची तिकिटंही बुक केली. मात्र रेल्वे गाड्या रद्द झाल्या. यानंतर 28 ऑगस्टला,  धनंजय आपल्यापत्नीसोबत स्कुटीने गोड्डावरून निघाले आणि  30 ऑगस्टला ग्वाल्हेर येथे पोहोचले.

महत्त्वाच्या बातम्या -

पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय जनरल बाजवांनी पाकिस्तान लुटला, जमवली अब्जावधींची संपत्ती?

"मुंबईला पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?" राऊत-कंगनाच्या वादात आता 'या' महिला नेत्याची उडी

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

Web Title: jharkhand husband drive 1176 km scooty for pregnant wife examination from godda to gwalior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.