IAS Pooja Singhal Husband Abhishek Jha Story : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आयएएस अधिकारी व झारखंडमधील खनन व उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. यात १५० कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचे दस्तावेज मिळाले. झारखंड, बिहारसह देशाच्या अनेक राज्यांत दुसऱ्या दिवशीही छापे टाकण्यात आले. दरम्यान, आता अभिषेक आणि पूजा यांनी लव्हस्टोरी गुगलवर सर्वाधिक सर्च केली जात आहे.
ऑस्ट्रेलियातून एमबीएची पदवी घेऊन परतलेल्या अभिषेक झा आणि पूजा सिंघल यांच्यातील मैत्री आणि लग्नाबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. यावरून त्या दोघांची मैत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्याचं दिसून येत आहे. तसंच नंतर एका जीममध्ये असल्यानं दोघांमध्ये मैत्रीही झाली.
आयएएस राहुल पुरवार यांच्याशी पहिलं लग्नदरम्यान, यापूर्वी पूजा सिंघल यांनी आपले सीनिअर असलेल्या आयएएस राहुल पुरवार यांच्या विवाह केला होता. परंतु त्यांच्यातील नातं फार काळ टिकलं नाही. सुरूवातीच्या दोन तीन वर्षांमध्ये त्यांच्या काही कारणांवरून मतभेद झाले. त्यानंतर त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु घटस्फोटापूर्वीच पूजा आणि अभिषेक यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होत गेल्याच्याही चर्चा आहेत. यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या मदतीनं त्यांनी विवाह केला. यानंतर काही काळातच त्यांच्या घरावर ईडीचे छापे पडले.
मोठं घबाडपूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांना ताब्यात घेतले आहे. आजवर १९.३१ कोटींची रोकड जप्त केली आहे. खुंटीच्या मनरेगा घोटाळ्यात ईडी त्यांच्यावर एवढी मोठी कारवाई करील, याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. ईडीने आता सीबीआयला पत्र लिहिले असून, गुन्हा दाखल करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार सीबीआय गुन्हा दाखल करू शकतो. पूजा सिंघल खुंटी व चतरामधील मनरेगा घोटाळ्यातही अडकलेल्या आहेत.
पतीच्याहॉस्पिटलवरईडीचीनजर पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांच्या पल्स रुग्णालयावरही ईडीची नजर आहे. यामार्फत मनी लाँड्रिंग केल्याचा संशय आहे. मनी लाँड्रिंगसाठी मेधांश हॉस्पिटल प्रा. लि. ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पल्स संजीवनी हेल्थ केअर प्रा. लि. नावाने कंपनी बनवून तिचे एकत्रीकरण केले. पल्स संजीवनी हेल्थ केअर प्रा. लि.मध्ये अभिषेक झा हे एम. डी. आहेत. पूजा यांचे बंधू सिद्धार्थ सिंघल, अभिषेक झा यांची बहीण अमिता झा व दीप्ती बॅनर्जी हेही संचालक आहेत. याच पत्त्यावर मेधांश हॉस्पिटल प्रा. लि. आहे. या दोन्हींचे २०१६ मध्ये एकत्रीकरण झाले.