नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार असून, 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. सध्या राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे. राज्यात काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे प्रमुख विरोधी पक्ष आहेत. त्याशिवाय संयुक्त जनता दल, जेव्हएम, बीएसपी, एजेएसयू हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असतील.
झारखंड विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल
भाजपा - 49
एजेएसयू - 3
झारखंड मुक्ती मोर्चा - 17
काँग्रेस - 5
जेव्हीएम (पी) -1
सीपीआय (एमएल) -1
बीएसपी - 1
एमससी -1