५ उमेदवार प्रथमच चढणार लाेकसभेची पायरी; तरुण उमेदवारांसह ज्येष्ठ आमदारही रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:37 AM2024-04-22T09:37:31+5:302024-04-22T09:38:05+5:30
झारखंडमध्ये लोकसभेसाठी २० लोकप्रतिनिधी रिंगणात आहेत. त्यात ९ लोकसभेचा विद्यमान खासदार, १ राज्यसभा खासदार तर १० आमदारांचा समावेश आहे.
रांची : झारखंडमध्ये लोकसभेच्या १४ जागांसाठी चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यापैकी पाच मतदारसंघांमधून विजयी होणारे उमेदवार हे प्रथमच संसदेत जाणार आहेत. त्यात धनबाद, चतरा, हजारीबाग, लोहरदगा आणि दुमका या मतदारसंघांचा समावेश आहे. येथील उमेदवारांनी आतापर्यंत एकदाही लोकसभेची निवडणूक जिंकली नाही किंवा ते प्रथमच निडवणूक लढवित आहेत. यामध्ये तरुण उमेदवारांसह काही ज्येष्ठ आमदारांचाही समावेश आहे.
२० लोकप्रतिनिधी रिंगणात
झारखंडमध्ये लोकसभेसाठी २० लोकप्रतिनिधी रिंगणात आहेत. त्यात ९ लोकसभेचा विद्यमान खासदार, १ राज्यसभा खासदार तर १० आमदारांचा समावेश आहे. झारखंडचे मतदार यापैकी किती जणांना लाेकसभेत पाठविते तसेच काेणाला प्रथमच संधी देते, याकडे लक्ष लागले आहे.
धनबाद - ढुल्लू महतो (भाजप) - अनुपमा सिंह (काँग्रेस)
चतरा - कालीचरण सिंह (भाजप) - के. एन. त्रिपाठी (काँग्रेस)
हजारीबाग - मनीष जयस्वाल (भाजप) - जे. पी. पटेल (काँग्रेस)
लोहरदगा - समीर उरांव (भाजप) - सुखदेव भगत (काँग्रेस)
दुमका - सीता सोरेन (भाजप) - नलिन सोरेन (झामुमो)