नबीन सिन्हा - नवी दिल्ली
विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या झारखंडमध्ये भाजपाला रोखण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल व जनता दल (युनायटेड) अर्थात जदयू या पक्षांनी कंबर कसली असून, त्यादिशेने हालचाली सुरू केल्या आहेत़
काँग्रेस नेते ए़ के.अॅन्टोनी यांनी मंगळवारी यादिशेने एक बैठक बोलावली आह़े राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख सुदेश भगत, अर्थमंत्री राजेंद्र सिंग, काँग्रेसचे सरचिटणीस बी़ के.हरिप्रसाद व राज्य छाननी कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र सिंग हे या बैठकीत भाग घेणार आहेत़ सोरेन यांनी 81 पैकी 45 जागा लढविण्याचा पक्षाचा इरादा बोलून दाखविला असला तरी, आघाडीतील सर्व पक्षांना सामावून घेण्यासाठी नवा फॉम्यरुला आखला जात आह़े झामुमो आणि काँग्रेस दोन्ही पक्ष प्रत्येकी 3क् जागा लढवतील, अशी अपेक्षा आह़े उर्वरित 21 जागा राजद आणि जदयू यांच्यात विभागल्या जाण्याची शक्यता आह़े लोकमतशी बोलताना राजेंद्र सिंग यांनी सांगितले की, भाजपाप्रणीत रालोआ आघाडीला रोखण्यासाठी महाआघाडीच्या माध्यमातून लढण्याचे पक्षाने ठरविले आह़े