शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मोठी दुर्घटनाः तेल टँकरनं लष्कर भरतीहून परतणाऱ्या 8 तरुणांसह 10 जणांना चिरडलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 8:20 AM

हरियाणातील जिंद जिल्ह्यात मंगळवारी रात्री रामराय गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे.

जिंदः हरियाणातील जिंद जिल्ह्यात मंगळवारी रात्री रामराय गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांना जागीच मृत्यू झाला आहे. यातील आठ तरुण हिसारमध्ये लष्करात भरतीत सहभागी झाल्यानंतर रिक्षानं परतत होते. त्याचदरम्यान हांसी रोडवरच्या रामराय गावाजवळ भरधाव वेगानं येणाऱ्या तेलाच्या टँकरनं रिक्षाला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये रिक्षाचालकाचाही समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लष्करात भरतीसाठी गेलेल्या तरुण शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण झाले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते घरी परतत होते. त्यावेळीच ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना हांसी रोडवरच्या रामराय गावाजवळ रात्री जवळपास 10.30 वाजताच्या दरम्यान झाली आहे. हिसारमध्ये लष्कराच्या भरतीत सहभाग घेतल्यानंतर ते तरुण रिक्षानं घरी परतत होते. त्याचदरम्यान पाठीमागून आलेल्या तेलाच्या टँकरनं रिक्षाला धडक देत तिला चिरडून तो टँकर पुढे निघून गेला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररीत्या जखमी आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमीची ओळख प्रेमजीत पुत्र सतीशच्या रूपात झाली आहे. जो बडताना येथे वास्तव्याला आहे. तीन मृतांची ओळख पटली असून, बाकी मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगिलतं आहे.