शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
3
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
4
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
5
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
6
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

कोळसाप्रकरणी जिंदल, राव, कोडा व इतरांना जामीन

By admin | Published: May 23, 2015 12:04 AM

काँग्रेस नेते व उद्योगपती नवीन जिंदल, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा व अन्य सात जणांना शुक्रवारी जामीन मंजूर केला.

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणी विशेष न्यायालयाने काँग्रेस नेते व उद्योगपती नवीन जिंदल, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा व अन्य सात जणांना शुक्रवारी जामीन मंजूर केला.जिंदल, राव, कोडा आणि माजी कोळसा सचिव हरीशचंद्र गुप्ता व अन्य विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पाराशर यांच्या न्यायालयात आरोपी म्हणून हजर झाले होते व या प्रत्येकाने जामिनासाठी स्वतंत्र अर्ज सादर केला होता. ‘सीबीआयने जेव्हा-जेव्हा बोलावले तेव्हा-तेव्हा माझे अशील तपासात सहभागी झाले आणि त्यांच्या फरार होण्याची वा न्यायापासून पळ काढण्याची भीती नाही,’ असे जिंदल यांचे वकील रमेश गुप्ता यांनी सांगितले. अन्य नऊ आरोपींच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. वरिष्ठ सरकारी वकील व्ही.के. शर्मा म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी हायप्रोफाईल उद्योगपती व राजकारणी आहेत व फिर्यादी पक्षाचे बहुतांश साक्षीदार हे त्यांचे कर्मचारी आहेत. आरोपींना जामीन मिळाला तर ते साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. दरम्यान आरोपींनी आपल्या परवानगीशिवाय भारत सोडून जाऊ नये, असे सांगून न्या. पाराशर यांनी पुढील सुनावणीसाठी १ जून ही तारीख निश्चित केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)४कोळसा खाणपट्टे वाटप करण्याचा निर्णय त्यांच्या (डॉ. मनमोहनसिंग यांच्या) कार्यालयाने घेतला होता, असे माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांनी शुक्रवारी विशेष न्यायालयात सांगितले. त्यावेळी मनमोहनसिंग यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचाही प्रभार होता. मनमोहनसिंग हे या प्रकरणातील एक आरोपी आहेत.