"त्यांच्यामध्ये जिन्नाचा आत्मा", योगी आदित्यनाथांचा वार, कुणाला डिवचलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 06:26 PM2024-08-29T18:26:45+5:302024-08-29T18:28:22+5:30

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीकेची तोफ डागली. मोहम्मद अली जिन्नांचे समर्थक असल्याचे विधान केले.

"Jinna's spirit in them", who did Yogi Adityanath say? | "त्यांच्यामध्ये जिन्नाचा आत्मा", योगी आदित्यनाथांचा वार, कुणाला डिवचलं?

"त्यांच्यामध्ये जिन्नाचा आत्मा", योगी आदित्यनाथांचा वार, कुणाला डिवचलं?

yogi Adityanath News:उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये एक सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. "कायदा आणि सुव्यवस्था, महिला सुरक्षा या मुद्द्यांवर बोलण्याचा समाजवादी पक्षाच्या प्रमुखांना (अखिलेश यादव) बोलण्याचा अधिकार नाही. अयोध्या, कन्नौजमध्ये त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून मुलींशी छेडछाड केली गेली आहे", असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

अलिगढ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना योगी आदित्यनाथ यांनी तरुणांना नियुक्ती पत्राचे वाटप केले. व्यावसायिकांना कर्ज वाटप, तर विद्यार्थ्यांना टॅब्लेट वाटप करण्यात आले. 

योगी आदित्यनाथ काय बोलले?

या कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, "समाजवादी पार्टी असो की काँग्रेस, यांच्यामध्ये जिन्नांचा आत्मा घुसलेला आहे. जिन्नांनी देशाची फाळणी करण्याचे पाप केले होते. शेवटच्या काळात ते हाल हाल होऊन मेले. तेच काम आज हे लोक (विरोधक) करत आहेत."

"समाजात फूट पाडत आहेत. विधाने करून सामाजिक घडी विस्कळीत करत करत आहेत. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे. विरोधकांचे कटकारस्थान यशस्वी होऊ दिले जाणार नाही", असा हल्ला योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर चढवला. 

मुली आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेशी तडजोड नाही -योगी आदित्यनाथ

"समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने उत्तर प्रदेशात दंगली घडवून आणल्या होत्या. आमच्या सरकारच्या काळात कोणत्याही दंगली घडल्या नाहीत. कुणाच्या मुलीला आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कुणी छेडछाड केली तर परिणाम भोगावे लागतील. सगळ्यांना सुरक्षा दिली जाईल. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही", असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

Web Title: "Jinna's spirit in them", who did Yogi Adityanath say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.