शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

JIO : प्राईम मेंबरशिपची मुदत वाढणार?

By admin | Published: March 26, 2017 11:34 AM

रिलायन्स जिओ प्राईम मेंबरशिप घेण्याची मुदत वाढवण्याची शक्यता

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - रिलायन्स जिओ प्राईम मेंबरशिप  घेण्याची मुदत वाढवण्याची शक्यता आहे. 30 एप्रिलपर्यंत जिओ प्राईम मेंबरशीप  घेण्याची मुदत वाढवू शकते असं मत दूरसंचार क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलं आहे. प्राईम मेंबरशिप ऑफरमध्ये जिओला अपेक्षित ग्राहकांपैकी केवळ 50 टक्के ग्राहकांना कायम ठेवण्यात यश आलं आहे.  त्यामुळे ही ऑफर आणखी वाढवली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
 
सध्या 31 मार्चपर्यंत जिओची प्राईम मेंबरशिप घेण्याची मुदत आहे.  प्राईम मेंबरशिपची मुदत वाढवण्यात आल्याची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही. रिलायन्स जिओची मोफत सेवा 31 मार्चपासून संपुष्टात येणार आहे.  त्यामुळे 1 एप्रिलपासून जिओची प्राईम मेंबरशिप सेवा सुरू होणार आहे. 31 मार्चपर्यंत यासाठी नोंदणी करता येणार आहे.
 
या ऑफरनुसार ग्राहकांना 1 एप्रिल 2018 पर्यंत ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरचा लाभ घेता येईल. म्हणजे प्रत्येक दिवशी 1GB डेटा आणि मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची  प्राईम मेंबरशिप मिळवण्यासाठी जिओ युझरला 99 रूपये द्यावे लागतील. एका वर्षासाठी ही मेंबरशिप असेल. त्यानुसार 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (1GB प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे.
कशी मिळवायची प्राईम मेंबरशिप-
जिओच्या वेबसाईटवरून किंवा माय जिओ अॅपवरुन प्राईम मेंबरशिप मिळवता येईल. या व्यतिरिक्त जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल.
जर प्राईम मेंबरशिप घेतली नाही तर काय होईल?
ग्राहकांना 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान प्राईम मेंबरशिपसाठी नोंदणी करता येणार आहे. जर तुम्ही मेंबरशिप घेतली नाही तर तुमचं जिओ सिम प्रीपेड किंवा पोस्टपेडमध्ये बदलण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला जिओच्या टेरिफ प्लॅननुसार रिचार्ज करावं लागेल. टेरिफ प्लॅननुसारही व्हॉईस कॉलिंग मोफत असेल मात्र, इंटरनेटसाठी पैसे मोजावे लागतील. प्राईम मेंबरशिप न घेणा-यांना सप्टेंबर 2016 मध्ये जिओने लॉन्च केलेल्या टेरिफ प्लॅननुसार 50 रुपयात 1GB 4G डेटा, 999 रुपयात 10GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा), 1499 रुपयात 20GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा), 2499 रुपयात 35GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा) मिळेल. याउलट मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप एक वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल.