J&K:जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आहे. अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून मोठ्याप्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. घात लावून बसलेल्या 3 ते 4 दहशतवाद्यांची हा गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत जवानांना काही झाले नाही, पण चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.
परिसराची नाकेबंदी मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घात लावून बसलेल्या तीन अज्ञात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला. ही घटना अखनूरच्या बटाल गावातील शिव मंदिराजवळ घडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) यांच्या पथकांनी मिळून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
घुसखोरीमुळे सुरक्षा धोक्यातगेल्या काही काळापासून राज्यात घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. 20 ऑक्टोबर रोजी गारंदल येथे झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी सीमेपलीकडून आले होते. या हल्ल्यात स्थानिक डॉक्टर आणि बिहारमधील दोन मजुरांसह सात जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत. तसेच, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स स्थानिक तरुणांना दहशतवादी गटात सामील होण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे.