मुंबई: रविवारी रात्री दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) झालेल्या राड्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जेएनयूत झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनाची आणि निषेधाची भूमिका घेतली आहे. तर याचे पडसाद सोशल मिडियावर सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहे. तर ट्विटरवरअमित शहा राजीनामा द्या (#AmitShahMustResign) हा ट्रेंड सुरु झाला आहे.
जवाहर लाल नेहरु विद्यापीठात चेहरा झाकलेल्या जवळपास 50 गुडांच्या टोळक्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यावेळी जमावाने विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली. त्यांनतर विविध क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. तर याच मुद्यावरून सरकारवर सुद्धा टीका होताना पाहायला मिळत आहे. तर या घटनेचा निषेध करण्यासाठी ट्वीटरवर (#AmitShahMustResign) असे ट्रेंड सुरू झाले आहेत.
आतापर्यंत 15 हजार 600 लोकांनी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत #AmitShahMustResign अशा पोस्ट ट्वीटरवर टाकल्या आहेत.