नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. यानंतर आता जेएनयू हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि गुगलला नोटीस बजावली आहे.
जेएनयू हिंसाचार प्रकरणी कॅम्पसमध्ये घडलेल्या घटनेबाबत संबंधित डेटा जतन करुन ठेवण्याच्या मागणीसाठी दिल्ली हायकोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि गुगलला नोटीस बजावली आहे. जेएनयूतील तीन प्राध्यापकांनी हिंसाचारावेळचे सीसीटीव्ही फुटेज, संदेश आणि इतर पुरावे जतन करण्यात यावेत या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी (13 जानेवारी) हायकोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि गुगलला नोटीस पाठवून मंगळवारपर्यंत यावर उत्तर मागितले आहे.
5 जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली. यावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँग सक्रिय असल्याचा आरोप भाजपा आणि अभाविपने केला आहे. तर जेएनयूला सर्वोत्तम विद्यापीठ गौरवणारं सरकार दुटप्पीपणानं वागत असून विद्यापीठाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप डाव्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
यूपीएससीच्या आयईएस परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा दबदबा; पटकावल्या 32 पैकी 18 जागा
जेएनयूचे कुलगुरू जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड; काँग्रेसचा आरोप
JNU भेटीचा दीपिका पादुकोणला असाही फटका, वाचा सविस्तर
ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्य भाजपानं मौन सोडलं
मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचा भुजबळांकडून खरपूस समाचार, म्हणाले...