नवी दिल्ली - जेएनयूमध्ये ५ जानेवारीला घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जेएनयू विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.आज विद्यार्थ्यांनी हे आंदोलन जेएनयू कॅम्पसमध्ये केले असून असंख्य विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. नक्षलवाद हो बरबाद, रेड टेरर डाउन डाउन आदी संदेश लिहिलेले फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. ५ जानेवारीला जेएनयू विद्यार्थी संघटना आणि एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनांची जेएनयू परिसरात बैठक बोलाविण्यात आली होती. त्यादरम्यान, हा हिंसाचार घडला. यात जेएनयू विद्यार्थी संघानेही अध्यक्षा आइशी घोष आणि शिक्षकांना मारहाण करण्यात आली होती.
नुकतेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्लीपोलिसांनी हल्लेखोरांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये पोलिसांना नऊ जणांची ओळख पटवली असून जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोषसह जेएनयूचा माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली आहे.
JNU Attack: 'हा घ्या पुरावा'... म्हणत पोलिसांनी दिली आइशी घोषसह ९ विद्यार्थ्यांची नावं!