शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

जेएनयू वादाचे देशभर पडसाद

By admin | Published: February 19, 2016 3:14 AM

एनयू वादाचे गुरुवारी देशभरात पडसाद उमटायला सुरुवात झाली असून, आज कन्हैया कुमारला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्यावरील कारवाईला विरोध कर

नवी दिल्ली : जेएनयू वादाचे गुरुवारी देशभरात पडसाद उमटायला सुरुवात झाली असून, आज कन्हैया कुमारला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्यावरील कारवाईला विरोध करण्यासाठी आसाममध्ये प्रचंड मोर्चा काढण्यात आला. गुवाहाटीमध्ये निघालेल्या या मोर्चात विद्यार्थी, शिक्षक यांच्याबरोबरच कलाकार आणि शेतकरीही सहभागी झाले होते. केरळ आणि बिहारमध्येही कन्हैयाच्या अटकेचे पडसाद उमटले. अलिगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही कन्हैयाच्या अटकेविरुद्ध मोर्चा काढला होता.पाटण्यात एआयएसएफचे विद्यार्थी नेते आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपच्या कार्यालयासमोर केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लाभले. दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत जमावाला पांगविले. केरळ विधानसभेत मुख्य विरोधी माकपच्या नेतृत्वातील एलडीएफने जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करीत स्थगन प्रस्ताव मांडला. पदाधिकाऱ्यांचे राजीनामे...दरम्यान, हा संपूर्ण वाद अयोग्य रीतीने हाताळल्याच्या निषेधार्थ जेएनयूमधील अभाविपचे अध्यक्ष राहुल यादव आणि संयुक्त सचिव प्रदीप नरवाल याच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. देशात तालिबानी संस्कृती नको. कायद्याला आपला मार्ग अवलंबू द्या, असे नरवाल याने म्हटले. आम्ही जेएनयूसाठी लढत राहू. कन्हैया किंवा उमर खालिद दोषी आढळल्यास कायदा त्यांना शिक्षा ठोठावेल, मात्र संपूर्ण विद्यापीठ, विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले व्हायला नको. असंतोषाचा आवाज व्यक्त व्हायलाच हवा, असेही तो म्हणाला.आ. शर्मा पोलीस ठाण्यात पतियाळा हाऊस कोर्टात भाकपच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना कॅमेऱ्यात पकडले गेलेले भाजपचे आमदार ओ.पी. शर्मा यांनी दिल्लीच्या टिळक मार्ग पोलिसांसमोर हजेरी लावली. सोमवारी पत्रकार आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत आ. शर्मा आणि तीन वकिलांना पोलिसांनी समन्स पाठविला होते. शर्मा यांना अटक करून लगेचच जामिनावर सोडण्यात आले.मंत्र्याला मारण्याची धमकीजेएनयूच्या मुद्यावर तोंड बंद ठेवा अन्यथा ठार मारू अशी मोबाईलवर धमकी मिळाल्याची माहिती दिल्लीचे मंत्री कपील मिश्रा यांनी दिली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केला. सकाळी ८.४८ वाजता माझ्या मोबाईलवर कॉल आला. पुजारी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने मला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘अपनी जुबान बंद रखो वर्ना गोली मार देंगे’ असे तो म्हणाला, मी त्याला हटकले असता त्याने ‘अब तो तुम्हे पक्काही मार देंगे’ अशी धमकी दिल्याचे मिश्रा यांनी सांगितले.‘टीका करा, शिव्या नकोत’देशभरात जेएनयू वादावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असताना केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रीजिजू यांनी एक भारतीय म्हणून देशाचे ऐक्य आणि एकात्मतेशी संलग्नता राखावी. लोक सरकारवर टीका करायला मोकळे आहेत; मात्र देशाला शिव्या देऊ नका, असे आवाहन फेसबुक पोस्टवरकेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)