नवी दिल्ली : जेएनयूत आयोजित एका कार्यक्रमात कथित स्वरूपात राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या गेल्यानंतर याप्रकरणी आता जेएनयू कायदेशीर सल्ला घेत आहे. या आरोपी विद्यार्थ्यांना किती शिक्षा देण्यात यावी याबाबत हा कायदेशीर सल्ला मागण्यात आला आहे. जर कारवाईबाबत पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय झाला, तर नव्याने आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विद्यापीठाच्या समितीने ११ मार्च रोजी आपला अहवाल सादर केला आहे; पण विद्यापीठाने यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. हा संवेदनशील विषय आहे. नियमांच्या आधारे आरोपी विद्यार्थ्यांना किती शिक्षा देता येईल यावर निर्णय घेण्यात येईल. विद्यापीठाच्या समितीने या विद्यार्थ्यांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. १४ मार्च रोजी या प्रकरणी २१ विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये? असे विचारण्यात आले आहे, तर विद्यार्थ्यांनी या प्रकरणी नव्याने तपास करण्याची मागणी करीत तपास समितीसमोर हजर होण्यास नकार दिला होता.
जेएनयू घेतेय कायदेशीर सल्ला
By admin | Published: April 04, 2016 2:47 AM