शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

JOB Alert : गुड न्यूज! 8वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी BECIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 5:29 PM

BECIL Recruitment 2021: आठवी पास ते ग्रॅज्युएटपर्यंत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडने एएआय कार्गो लॉजिस्टिक अँड एलाइड सर्विसेज कंपनी लिमिटेड (AAI Cargo Logistic & Allied Services Company Ltd.) मध्ये आठवी पास ते ग्रॅज्युएटपर्यंत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. BECIL मध्ये विविध पदासाठी भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बेसिलची (Broadcast Engineering Consultants India Limited) अधिकृत वेबसाईट www.becil.com वर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

कोणत्या जागांसाठी पदभरती

अप्रेंटिस  किंवा लोडर (Apprentice or Loader)  - एकूण जागा 73

सुपरवायजर (Supervisor) - एकूण जागा 26

सीनियर सुपरवायजर  (Senior Supervisor) - एकूण जागा 4

शैक्षणिक पात्रता

सुपरवायजर आणि सीनियर सुपरवायजर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. 

संगणकाच्या ज्ञानासह किमान एक वर्षाचा अनुभव असणंही आवश्यक आहे. 

लोडर या पदासाठी आठवी पास असणं आवश्यक आहे. तसेच स्थानिक भाषा आणि हिंदीत संवाद साधता येणं गरजेचं आहे. 

इतका मिळेल महिन्याला पगार 

लोडर (Apprentice or Loader)  - 14,014 रुपये

सुपरवायजर (Supervisor) - 18,564 रुपये

सीनियर सुपरवायजर  Senior Supervisor) - 20,384 रुपये 

किती आहे शुल्क

सामान्य, ओबीसी यांच्यासाठी 750 / 

एससी / एसटी, ईडब्ल्यूएस / पीडब्ल्यूडी - 450 /

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 आहे.

फी जमा करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत