नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. गेलमध्ये सरकारी नोकरी भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी गेल (इंडिया) लिमिटेडने विविध विभागांमधील एकूण 220 सरकारी नोकऱ्यांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बुधवार 7 जुलै 2021 रोजी गेलने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मॅकेनिकल, मार्केटिंग, एचआर, सिव्हिल, लॉ, राजभाषा इत्यादी विभागांमधील व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी आणि अधिकारी या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवार गेल (इंडिया) लिमिटेड gailonline.com या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जुलैपासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 5 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील. उमेदवारांना 200 रुपये फी देखील भरावी लागेल, जे अर्जादरम्यान ऑनलाईन पद्धतीने भरली जाऊ शकते. मात्र एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज फी जमा करण्याची गरज नाही. या उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये पूर्ण सवलत दिली जाते.
'या' पदांसाठी होणार भरती
व्यवस्थापक (मार्केटिंग वस्तू जोखीम व्यवस्थापन): 4 पदे व्यवस्थापक (मार्केटिंग आंतरराष्ट्रीय एलएनजी व शिपिंग): 6 पदेवरिष्ठ अभियंता (रसायन): 7 पदेवरिष्ठ अभियंता (यांत्रिकी): 51 पदेवरिष्ठ अभियंता (विद्युत): 26 पदेवरिष्ठ अभियंता (वाद्य): 3 पदेवरिष्ठ अभियंता (सिव्हिल): 15 पदेवरिष्ठ अभियंता (गेल्टेल टीसी / टीएम): 10 पदेवरिष्ठ अभियंता (बॉयलर ऑपरेशन): 5 पदेवरिष्ठ अभियंता (पर्यावरण अभियांत्रिकी): 5 पदेवरिष्ठ अधिकारी (ई अँड पी): 3 पदेवरिष्ठ अधिकारी (एफ अँड एस): 10 पदेवरिष्ठ अधिकारी (सी आणि पी): 10 पदेवरिष्ठ अधिकारी (बीआयएस): 9 पदेवरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग): 8 पदेवरिष्ठ अधिकारी (एचआर): 18 पदेवरिष्ठ अधिकारी (कॉर्पोरेट कम्युनिकेशन): 2 पदे 2वरिष्ठ अधिकारी (कायदा): 4 पदे वरिष्ठ अधिकारी (एफएंडए): 5 पदेअधिकारी (प्रयोगशाळा): 10 पदेअधिकारी (सुरक्षा): 5 पदे अधिकारी (भाषा): 4 पदे
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.