नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन सुरु केले आहे. यामुळे अनेक कंपन्यांचे कंबरडे मोडणार असून मोठ्या प्रमाणावर नोकर कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारनेही धास्ती घेतली असून यावर उपाययोजना करण्यासाठी पाऊले उचलत आहे. यासाठी कंपन्यांना काही नियमांमध्ये मोठी सूट देण्यात येण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार पगार आणि कामाच्या बाबतीत काही नियम ढीले करण्याची शक्यता असल्याचे वृत्त एनबीटीने दिले आहे. यामध्ये दिवाळी बोनस रोखणे, किमान पगारामध्ये होणारी इन्क्रीमेंट, ओव्हरटाईम पेमेंट रेटमध्ये घट करणे आणि कामाचे तास वाढविण्यासंबंधीत मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, हे बदल नोटिफिकेशन किंवा सुधारणा विधेयकाद्वारे केले जाऊ शकतात. कोरोना व्हायरसच्या उपद्रवामुळे आर्थिक संकट ओढवणार आहे. याविरोधात लढण्यासाठी केलेले हे बदल वर्षभर लागू राहण्याची शक्यताही या अधिकाऱ्याने वर्तविली आहे. यामुळे केंद्र सरकारवर कोणतेही अतिरिक्त आर्थिक ओझे राहणार नाही. मात्र, कंपन्यांचा कर्मचाऱ्यांवरील खर्च वाचणार आहे.
पगारवाढ टाळल्यास कंपन्यांचा पैसा वाचणारपगारवाढ टाळल्यास कंपन्यांचा पैसा वाचणार आहे. पेमेंट ऑफ बोनस अॅक्ट १९६५ नुसार काही श्रेणीच्या कंपन्यांना फायदा किंवा उत्पादनाच्या उत्पादकतेच्या आधारे कर्मचाऱ्यांना वर्षाला ८.३३ टक्क्यांच्या आधारे बोनस देणे बंधनकारक आहे. याशिवाय कंझ्यूमर प्राईस इंडेक्सनुसार कामगारांना मिनिमम वेज वर्षाला ८ ते १२ टक्के वाढ देणेही बंधनकारक असते. सरकारच्या विचानानुसार जर ही वाढ टाळल्यास कंपन्यांचा पैसा वाचेल.
सरकारला कंपन्यांची काळजी? हे बदल झाल्यास ते संघटीत क्षेत्रातील कंपन्यांना लागू होणार आहेत. देशात ५० कोटी कामगारांपैकी जास्तीतजास्त १० टक्के कामगार या क्षेत्रात मोडतात. मात्र, यामुळे लघु, छोट्या आणि मध्यम कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. इंडियन स्टाफिंग फेडरेशनचे अध्यक्ष लोहित भाटिया यांनी सांगितले की, कायद्यामध्ये छोटे बदल केल्याने सरकारला नोकरी देणाऱ्यांचीच अधिक काळजी असल्याचा संदेश जाऊ शकतो. मात्र, याद्वारे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्याही वाचणार आहेत.
कामाचे तास वाढणार? सध्याच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना ८ ते ९ तास काम करावे लागते. मात्र, बदल झाल्यास १२ तास काम करावे लागणार आहे. यावर विचार सुरु असून या अतिरिक्त तासाचे पैसे दुप्पट देण्य़ाऐवजी सामान्य पगाराप्रमाणे देण्याबाबत विचार सुरु आहे.
आणखी वाचा...
अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात
कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी बळी जाण्याची भीती