नवी दिल्ली - सध्याच्या मंदीच्या काळात सरकारी बँकांमध्ये काम करण्याची संधी चालून आलेली आहे. इंस्टीट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर्स (पीओ) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (एमटी) च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया IBPS.in वर आजपासून( ५ ऑगस्ट) सुरू झाली आहे.
आजपासून सुरू झालेल्या या भरती प्रकियेच्या ऑनलाइन अर्जाची लिंक आयबीपीएसच्या IBPS.in या अधिकृत संकेतस्थळावर आज ओपन झाली आहे. इच्छुक उमेदवार या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही २६ ऑगस्ट २०२० आहे. तसेच अर्ज प्रिंट करण्याची अंतिम तारीख ही १० सप्टेंबर २०२० आहे.
आयबीपीएसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्प्यात पूर्व परीक्षा आणि दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होतील. दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. तिथे उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
या भरती प्रक्रियेबाबतच्या महत्त्वपूर्ण तारखा पुढील प्रमाणे आहेत
ऑनलाइन नोंदणी ५ ते २६ ऑगस्ट २०२०
प्रीलिम्स ट्रेनिंगसाठी कॉललेटर डाऊनलोड - सप्टेंबर २०२०
पूर्व परीक्षेच्या ट्रेनिंगसाठी तारीख २१ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२०
ऑनलाइन पूर्व परीक्षेसाठी कॉल लेटर डाऊनलोड ऑक्टोबर २०२०
ऑनलाइन पूर्व परीक्षा ३, १० आणि ११ ऑक्टोबर २०२०
पूर्व परीक्षेच्या निकालांची घोषणा ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२०
ऑनलाइन मुख्य परीक्षा कॉल लेटर डाऊनलोड नोव्हेंबर २०२०
ऑनलाइन मुख्य परीक्षा २८ नोव्हेंबर २०२०
ऑनलाइन मुख्य परीक्षेच्या निकालाची घोषणा डिसेंबर २०२०
मुलाखतीसाठी कॉल लेटर डाऊनलोड जानेवारी २०२१
मुलाखत जानेवारी/फेब्रुवारी २०२१
प्रोव्हिजनल अलॉटमेंट एप्रिल २०२१