Lok Sabha Secretariat Recruitment 2021: लोकसभा सचिवालयामध्ये विविध जागांवर भरती निघाली आहे. या भरतीमध्ये हेड कन्सल्टंट, सोशल मीडिया मार्केटिंग (सीनियर कन्सल्टंट), सोशल मीडिया (ज्युनियर कन्सल्टंट), ग्राफिक डिझायनर, सीनियर कंटेंट रायटर (हिंदी), ज्युनिअर कंटेंट रायटर (हिंदी) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनिअर असोसिएट) आदी 9 पदांवर भरती करण्यात येणार आहे.
Lok Sabha Consultant Recruitment: पदांची संख्या...हेड कन्सल्टंट - 01सोशल मीडिया मार्केटिंग - 01सोशल मीडिया - 01ग्राफिक डिझायनर - 01सीनियर कंटेंट रायटर - 01ज्युनिअर कंटेंट रायटर - 01सोशल मीडिया मार्केटिंग - 03
शिक्षणाची अट...लोकसभा सचिवालयात या भरतीसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. य़ामध्ये 12 वी पास ते ग्रॅज्युएट आणि एमबीएपर्यंत शिक्षण लागणार आहे.
वयाची अट...लोकसभा सचिवालयात कन्सल्टंट भरतीसाठी वयाची अट 22 ते 58 वर्षे ठेवण्यात आली आहे.
पगार...सोशल मीडिया मार्केटिंग पदासाठी 35,000 रुपये प्रति महिना आणि हेड कन्सल्टंट पदासाठी 90000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.
अर्ज कसा कराल...या पदांसाठी ऑफलाईनद्वारे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर 21 दिवसांनी असणार आहे. 18 जानेवारीला नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 8 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट loksabha.nic.in वर जाऊन अर्ज डाऊनलोड करू शकतात.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...