कोरोना आणि पावसाळी वातावरणात सध्या सरकारी नोकऱ्यांचा पाऊसच सुरु आहे. एसबीआय, पोस्ट, पोलिसांनंतर आता बँक ऑफ इंडियात (BOI Recruitment 2020) नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. यामध्ये 42020 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.
बँक ऑफ इंडियाने या भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामधील अटींनुसार अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी 10 वी पास ते पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.
पदे आणि पगारअधिकारी दर्जाच्या 14 जागा असून पगार 23700 ते 42020 रुपये दिला जाणार आहे. क्लार्क दर्जाच्या 14 जागा असून पगार 11765 ते 31540 रुपये एवढा दिला जाणार आहे.
अर्ज कोण करू शकणार...अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विभागाची पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय A, B आणि C कॅटेगरीमध्ये स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे. क्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 10 वी पास असणे बंधनकारक आहे. तसेच D श्रेणीतील स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.
वयाची अटया भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. वयाची मोजणी 01.07.2020 च्या आधारे केली जाणार आहे.
शुल्क या जागांसाठी SC/ST/PWD मधील उमेदवारांना 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर अन्य उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे करता येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट https://bankofindia.co.in/ वर जाऊन 16 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीखही 16 ऑगस्ट आहे.
अन्य़ महत्वाच्या बातम्या...
मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली
‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र
Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??
सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले
आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...