नवी दिल्ली : रोजगारासाठी लागणारी पात्रता, प्रतिभा वा क्षमता याबाबतीत देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानी असून, तामिळनाडू व उत्तर प्रदेश यांचा त्या खालोखाल क्रमांक लागतो, असे एका सर्वेक्षणातून आढळले आहे. मुंबई, हैदराबाद व पुणे ही सर्वाधिक रोजगारक्षम शहरे असल्याचेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.
रोजगारासाठी लागणाऱ्या प्रतिभेत महाराष्ट्र आधी नवव्या तर तामिळनाडू दहाव्या स्थानी होते, पण या दोन्ही राज्यांनी पहिल्या व दुसºया स्थानी झेप घेतली. पश्चिम बंगालची यंदा घसरण झाली, तर हरयाणाचा क्रमांक पहिल्या १0 मध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडिया स्किल रिपोर्टमध्ये ही माहिती आहे. रोजगारक्षम शहरांत मुंबई पहिल्या, हैदराबाद दुसºया स्थानी आहे. बंगळुरू, दिल्ली, पुणे, लखनौ व चेन्नई यांनी सहा वर्षे पहिल्या दहांत आहेत.
२८ राज्यांत पाहणी
२८ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेशांत हे सर्व्हेक्षण केले. त्यात ३५ संस्थांमधील तब्बल ३ लाख रोजगार मिळवू पाहणाºया उमेदवारांशी चर्चा करून हा अहवाल बनविला आहे.