महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजस्थानात भाजपा-काँग्रेसमध्ये वाक् युद्ध, राजीनामा मागितला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 05:09 PM2022-12-07T17:09:14+5:302022-12-07T17:18:58+5:30

राजस्थानमधील गेहलोत सरकारमधील एका मंत्र्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर राजस्थानमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

jodhpur news objectionable video of ashok gehlot minister saleh mohammad rajasthan viral bjp seeks resignation | महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजस्थानात भाजपा-काँग्रेसमध्ये वाक् युद्ध, राजीनामा मागितला

महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजस्थानात भाजपा-काँग्रेसमध्ये वाक् युद्ध, राजीनामा मागितला

googlenewsNext

राजस्थानमधील गेहलोत सरकारमधील एका मंत्र्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर राजस्थानमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या व्हिडिओ प्रकरणात राजस्थानच्या अल्पसंख्याक मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपने केला आहे, राजस्थान भाजपने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. तरुणांनी तिचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर ब्लॅकमेलिंगमुळे मानसिक त्रास होत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

कोरोनात माय-बाप गमावले, LICवाले घर जप्तीसाठी मागे लागलेले; पुनावालांनी कर्जाचे 27 लाख रुपये 'फेडले'

दुसरीकडे राजस्थान भाजपने मंत्री शाले मोहम्मद यांचा व्हायरल व्हिडिओ ट्विट करून गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'अशोक गेहलोत जी, तुमच्या मंत्र्याचा महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, तुम्ही मंत्री शाले मोहम्मद यांना हटवणार की व्होट बँकेच्या लालसेपोटी त्यांना सोडणार?, असं यात म्हटले आहे. 

या व्हिडिओ वरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसकडून याबाबत अजुनही प्रतिक्रिया आलेली नाही. या व्हिडिओवरुन गेहलोत सरकारचे रुप समोर आल्याचा आरोप भाजप नेते लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी केला आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

Web Title: jodhpur news objectionable video of ashok gehlot minister saleh mohammad rajasthan viral bjp seeks resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.