कोरोना काळात वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक अविश्वसनीय घटना समोर येत आहेत. मृतदेह अंत्यसंस्कारावेळी जिवंत झाल्याच्या कितीतरी घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना जोधपूर राजस्थानच्या भदवासिया गावातून समोर आली आहे. येथील एका परिवाराने घरातील वयोवृद्ध महिलेच्या शरीराची काहीच हालचाल होत नसल्याने तिला मृत मानलं. सर्व नातेवाईकांना याची माहिती देत बोलवूनही घेतलं. पण नियतीला वेगळंच काहीतरी मंजूर होतं.
सगळे लोक सकाळ होण्याची होण्याची वाट बघत होते. अशात दोन तासांनंतर मृत समजण्यात आलेल्या वयोवृद्ध महिलेने अचानक डोळे उघडले आणि म्हणाली - 'अज्जू मला चहा दे'. हे ऐकताच परिवारातील सगळे लोक हैराण झाले. त्यांनी डोळे उघडले आणि पुन्हा बंद केलेत. मात्र, श्वास सुरू होता आणि पल्सची चालू होती.
त्यानंतर परिवारातील लोक त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ५ वर्षीय इंद्रा देवी यांना तपासलं आणि मृत घोषित केलं. निराश झालेले कुटुंबीय त्यांना पुन्हा घरी घेऊन आले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. (हे पण वाचा : हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजणाऱ्या आईसाठी मुलानं केलं असं काही, डॉक्टर-नर्सेसनाही कोसळलं रडू)
काय आहे पूर्ण घटना
राजस्थान हायकोर्टात काम करणारे हेमंत सोलंकी यांनी सांगितले की, त्यांच्या आईला २ दिवसांआधी पेरलेटिक अटॅक आला होता. पण २ दिवसानंतर त्यांची तब्येत चांगली सुधारली. बुधवारी सकाळी ४ वाजता त्या उठल्या आणि टॉयलेटला गेल्या. तेव्हा त्या अचानक पडल्या. नंतर त्यांना बाहेर आणून बेडवर ठेवण्यात आलं. पण त्यांच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांना सर्व नातेवाईकांना बोलवून घेतलं. (हे पण वाचा : १० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ)
अचानक आईने मागितला चहा
हेमंत यांचे जे नातेवाईक आले त्यांनीही पाहिलं की, आईचं शरीर थंड पडलं आहे. श्वास बंद झाला होता आणि पल्सही सुरू नव्हती. हेमंतच्या नातेवाईकांनीही आईला मृत समजून बेडवरून खाली ठेवलं. साधारण ६ वाजत अचानक हेमंतच्या आईने डोळे उघडले आणि म्हणाली 'अज्जू चाय पिला दे'. यावर सगळेच थक्क झाले. ते लगेच आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण डॉक्टरांनी तिथे गेल्यावर त्यांना मृत घोषित केले.
हेमंत सोलंकी म्हणाले की, २ तासांपर्यंत आईच्या शरीरात काहीच हालचाल नसल्यावर आईने अचानक आवाज दिल्याने त्यांना वाटलं आई परत आहे. आपल्या सोबत राहणार आहे. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.