नवी दिल्ली - विज्ञानाने खूप प्रगती केली असली तरी देशातील अनेक भागांत अद्यापही अंधश्रद्धेचा कहर पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानच्या भीलवाड्यामध्ये घडली आहे. उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाने चिमुकलीला गरम सळईचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. यामध्ये मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भीलवाडा येथील एका मांत्रिकाने निमोनियाचे उपचार करतो सांगून अडीच वर्षीय मुलीला गरम सळईने चटके दिले आहे.
चिमुकलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, "मुलीची प्रकृती ही अचानक बिघडली होती. त्यामुळे तिला उपचारासाठी कालेरा गावात नेण्यात आलं. एका वृद्ध व्यक्तीने उपचार करतो सांगून मुलीला चटके दिले" त्या मांत्रिकाचं नाव देखील आपल्याला माहीत नाही असं म्हटलं आहे. मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुलीच्या कुटुंबीयांनी गरम सळईने तिला चटके दिल्यावर तिची प्रकृती आणखी बिघडल्याची माहिती दिली. मुलीच्या अंगावर अनेक ठिकाणी भाजल्याच्या खुणा आहेत. सध्या तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे."
डॉक्टर सध्या चिमुकलीवर उपचार करत असून पोलीस आणि अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी देखील भीलवाडा जिल्ह्यातील लुहारिया गावामध्ये एका पाच महिन्यांच्या चिमुकलीला गळम सळईने चटके दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. तर गेल्या काही वर्षांत 20 हून अधिक लहान मुलांन निमोनिया उपचाराच्या नावे गरम सळईने चटके दिले जात आहे. यातील सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी काही ठिकाणी पोलिसांत देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सासरच्यांकडून बुलेट न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला 6 दिवस डांबून ठेवलं, बेदम मारलं
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कौशांबीमध्ये (Kaushambi News) नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सासरच्यांकडून बुलेट (Bullet Bike) न मिळाल्याने नाराज झालेल्या पतीने आपल्या पत्नीला तब्बल 6 दिवस डांबून ठेऊन तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला कशीबशी पतीच्या तावडीतून आपली सुटका केली आणि पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांना आपल्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या पतीने माहेरच्यांकडून बुलेट आणण्यास सांगितलं होतं. मात्र त्याला बुलेट न मिळाल्याने पती नाराज झाल्याची माहिती महिलेने दिली आहे. संतापलेल्या पतीने मला आठवड्याभर बांधून ठेवलं होतं. त्यानंतर त्याने बेल्टने मला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.