नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ऑनलाईन लुडो खेळताना दिराच्याच प्रेमात वहिनी पडल्याची घटना समोर आली आहे. दीर आणि वहिनी एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की एकमेकांसाठी दोघांनीही घरदार सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. महिला पतीला सोडून पळून गेली आणि आपल्या दिरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. लवकरच लग्न करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र लग्न होण्यापूर्वीच दीर अचानक गायब झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जोधपूरमध्ये ही घटना घडली आहे. जोधपूरमध्ये राहणारी नीतू नावाची महिला ऑनलाईन लुडो खेडत असे. तिचा दीर प्रविणदेखील हाच खेळ खेळत होता. त्यामुळे दोघांचीही खेळाच्या निमित्ताने चांगलीच गट्टी जमली. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. एकमेकांसाठी ते घरातून पळाले. या दोघांनी एक घर भाड्याने घेतलं आणि तिथे ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. लवकरच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी कोर्टात नोंदणी करून तारीखदेखील निश्चित केली होती.
लग्नाची तारीख आली असतानाच प्रविण अचानक गायब झाला. दुसऱ्या दिवशीदेखील तो घरी न आल्यामुळे तो गायब झाल्याचं नीतूच्या लक्षात आलं. तिने पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवली. प्रविणच्या घरच्यांनीच त्याला गायब केल्याचा दावा नीतूने केला आहे. हे लग्न होऊ नये, यासाठी प्रविणच्या घरच्यांनी त्याला गायब केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी प्रविणचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी नीतू आणि तिच्या पतीचं पटत नसल्याची माहिती दिली आहे. नीतू आणि तिच्या पतीमध्ये 8 वर्षांचं अंतर असून पतीसोबत राहण्याची इच्छा नसल्याचं नीतूने सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे, सीतामढीमध्ये शासकीय परिसरासमोर डॉक्टरांच्या खासगी क्लिनिकमध्ये गोळीबार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पोलीस तपासात याबाबता आता भयंकर खुलासा करण्यात आला आहे. डॉक्टरची पहिली पत्नी सीमा सिन्हा यांचा हात असल्याचं आता समोर आलं आहे. डॉक्टरांच्या दुसऱ्या पत्नीच्या हत्येचा पहिल्या पत्नीने कट रचला होता. मात्र डॉक्टरांच्या दुसऱ्या पत्नीने मास्क (Mask) लावल्याने तिला ओळखता आलं नाही आणि तिसरीच महिला अडकली व तिचा जीव गेला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.