शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
6
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
7
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
8
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
9
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
10
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
11
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
12
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
13
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
14
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
15
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
16
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
17
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
18
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
19
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
20
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा

दिल्लीत दाखल होताच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भेटलेली चिमुकली कोण? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 10:03 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे दिल्लीतील पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले.

Joe Biden In India: राजधानी दिल्लीत आयोजित G-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) दिल्लीत दाखल झाले आहेत. बायडेन यांचे पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जो बायडेन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित असलेल्या एका चिमुरडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की, ती चिमुकली नेमकी कोण आहे?

जो बायडन विमानतळावर दाखल झाल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांसह अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटीदेखील (Eric Garcetti) त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून एरिक गार्सेटी यांची मुलगी माया (Maya Garcetti) आहे. माया गार्सेट्टीने जो बायडेन यांचे स्वागत केले. मायाला भेटून बायडेनदेखील खूप आनंदी दिसले. मायाला पाहताच त्यांनी तिला मिठीही मारली. माया आणि बायडेन यांची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. 

माया याआधीही चर्चेत आलीयापूर्वी एरिक गार्सेट्टी यांना अमेरिकेचे भारतातील राजदूत बनवल्यानंतर माया प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यावेळी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एरिक गार्सेटी यांना अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ दिली होती. त्यानंतर शपथ घेताना एरिक यांची मुलगी माया बायबल हातात घेऊन उभी होती. 

एरिक गार्सेटी कोण आहे?एरिक गार्सेट्टी हे सध्या नवी दिल्लीतील यूएस दूतावासात अमेरिकेचे राजदूत आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात रोड्स स्कॉलर होते आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्ही रिझर्व्हमध्ये अधिकारी म्हणूनही काम केले आहे. एरिक गार्सेट्टी हे जुलै 2013 ते डिसेंबर 2022 पर्यंत लॉस एंजेलिसचे 42वे महापौर होते. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या लॉस एंजेलिसचे पहिले ज्यू महापौर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनG20 Summitजी-२० शिखर परिषदdelhiदिल्लीAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी