हैदराबाद : हिंद व प्रशांत महासागराच्या क्षेत्रात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतासहित चार देशांच्या क्वाड गटाकरिता हैदराबादमध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लसी हे एक महत्त्वाचे अस्त्र बनल्या आहेत. (Johnson & Johnson's 500 million doses of anti-China vaccine in Hyderabad to be produced annually)चीनने लसींचा विविध देशांना पुरवठा करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी क्वाड गट ज्या कोरोना लसी इतर देशांना पाठवील, त्या लसींचे उत्पादन हैदराबादमध्ये होणार आहे. या शहरात बायोलॉजिकल ई, भारत बायोटेक, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स, शांता बायोटेक्निक्स अशा लसनिर्मिती करणाऱ्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत. भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही स्वदेशी लस बनविली. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने लसीचे उत्पादन करण्यासाठी बायोलॉजिकल ई या कंपनीशी गेल्या ऑगस्ट महिन्यात करार केला. त्यानुसार ५० कोटी डोसांचे उत्पादन दरवर्षी करण्यात येणार आहे. मात्र उत्पादनाची ही क्षमता पुढच्या वर्षीपर्यंत १ अब्ज डोसपर्यंत नेण्यासाठी क्वाड गटातील देशांनी बायोलॉजिकल ई या कंपनीला नवे तंत्रज्ञान हस्तांतरणाचा निर्णय घेतला आहे.
युरोपमध्ये जाणवतोय कोविशिल्डचा तुटवडायुरोपीय समुदायातील देशांना ॲस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्डचा तुटवडा आहे. या लसीच्या उत्पादनात येणाऱ्या अडचणी तसेच निर्यातीवरील काही बंधने यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. कोविशिल्ड लसीमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात, असा समज पसरल्यामुळेच आधीच या लसीबद्दल लोकांच्या मनात काहीशी नाराजी आहे.