ग्वाल्हेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी सकाळी ‘आकाश’ या स्वदेशी सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची चावी प्रतीकात्मक रूपात भारतीय वायुसेनेच्या स्वाधीन केली. याबरोबरच ‘आकाश’ हे क्षेपणास्त्र औपचारिकरीत्या भारतीय वायुसेनेत सामील झाले.मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथील हवाई तळावर आयोजित एका कार्यक्रमात भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस.के. शर्मा आणि संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी ‘आकाश’ची प्रतीकात्मक चावी वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप सहा यांच्याकडे सोपविली. याआधी ‘आकाश’ भारतीय लष्करात सामील करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
‘आकाश’ भारतीय वायुदलात सामील
By admin | Published: July 11, 2015 12:29 AM