नवी दिल्ली : ‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’मध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, असा सल्ला देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले की, तीन मंत्रालयांनी तरुणांसाठी ही इंटर्नशिप सुरु केली आहे. यात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार दिला जाईल.आकाशवाणीवरील ‘मन की बात’या कार्यक्रमात पंतप्रधानांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळाडूंच्या शानदार कामगिरीचा उल्लेख केला आणि त्यांचे अभिनंदन केले. कुस्ती, बॅडमिंटन, टेबल-टेनिसमधील खेळाडूंचा त्यांनी विशेष उल्लेख केला. महिला खेळाडूंचेही त्यांनी कौतुक केले.पोखरणने भारताचीआण्विक शक्ती सिद्ध केलीपोखरणमध्ये २० वर्षांपूर्वी घेतलेल्या आण्विक चाचणीने जगात भारताची आण्विक शक्ती सिद्ध केली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ११ मे १९९८ रोजी बुद्ध पौर्णिमेला ही चाचणी घेतली होती. भारत हा महान वैज्ञानिकांचा देश आहे, हा संदेश यातून गेला. त्या दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’हा मंत्र दिला, असे ते म्हणाले.
स्वच्छ भारत समर इंटर्नशिप कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, मोदी यांचे तरुणांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:29 AM