इंफाळ: १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर सरकारने बुधवारी सशर्त परवानगी दिली. काँग्रेसने अर्ज केल्यानंतर उपस्थितांच्या मर्यादित संख्येत येथील हट्टा कांगजेबुंग मैदानातून यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी ही परवानगी देण्यात आली. ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या उद्घाटन समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. तसेच त्या दिवशी सशस्त्र सेना वयोवृद्ध दिनाच्या स्मरणार्थ राज्य कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर इंफाळ पूर्व जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे.
आवश्यक उपाययोजनांसाठी सहभागींची संख्या आणि नावे या कार्यालयास आगाऊ प्रदान करावीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशात म्हटले आहे. दरम्यान, यात्रेला सशर्त परवानगी देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अंतिम निर्णय घेतलेला नाही.