शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

हुडको कर्जप्रकरणी दिवाळीनंतर संयुक्त बैठक नगरविकास सहसचिवांचे आश्वासन: आयुक्तांकडून गाळे प्रश्नाची घेतली सविस्तर माहिती

By admin | Published: October 22, 2016 12:53 AM

जळगाव: मनपाच्या हुडको कर्जप्रकरणी दिवाळीनंतर शासन, मनपा व हुडकोच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन नगरविकास विभागाचे सहसचिव गोखले यांनी मनपा आयुक्तांना दिले. शुक्रवारी आयुक्त जीवन सोनवणे यांनी मंत्रालायात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी हुडकोच्या विषयावर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आश्वासन दिले. त्यामुळे या विषयाची कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच यावेळी मनपाच्या गाळे कराराच्या विषयाबाबतची सविस्तर माहितीही त्यांनी घेतली. ठराव क्र.४० च्या निलंबन रद्दच्या सुनावणीसंदर्भात ही माहिती घेतल्याचे समजते.

जळगाव: मनपाच्या हुडको कर्जप्रकरणी दिवाळीनंतर शासन, मनपा व हुडकोच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन नगरविकास विभागाचे सहसचिव गोखले यांनी मनपा आयुक्तांना दिले. शुक्रवारी आयुक्त जीवन सोनवणे यांनी मंत्रालायात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी हुडकोच्या विषयावर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आश्वासन दिले. त्यामुळे या विषयाची कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच यावेळी मनपाच्या गाळे कराराच्या विषयाबाबतची सविस्तर माहितीही त्यांनी घेतली. ठराव क्र.४० च्या निलंबन रद्दच्या सुनावणीसंदर्भात ही माहिती घेतल्याचे समजते.
मनपाचा हुडको कर्जाचा विषय रखडला आहे. मनपाने तत्कालीन नगरपालिका अस्तित्वात असताान हुडको कडून विविध विकास कामांसाठी व गलिच्छ वस्ती निर्मूलनासाठी १४१.३४ कोटींच्या कर्जाची उभारणी केली होती. त्यास शासनाने हमी दिली होती. या कर्जापोटी मनपाने हुडकोला मुद्दल व व्याज मिळून आतापर्यंत २६७.२१ कोटी इतकी परतफेड केली आहे. असे असतानाही हुडकोने मनपाविरूद्ध ३४०.७५ कोटींची डिक्री डीआरटीकडून (डेबीट रिकव्हरी ट्रीब्युनल) मंजूर करवून घेतली आहे. त्या डिक्रीस सध्या दिल्ली येथील अपिलीय प्राधिकरणाने (डीआरएटी) स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनपा दरमहा ३ कोटीचा हप्ता हुडकोला भरत असून कोर्टाच्या आदेशानुसारच मनपाने एकरकमी कर्जफेडीसाठीचा १३.५८ कोटीचा प्रस्तावही शासनामार्फत हुडकोला सादर केला आहे. मात्र त्याबाबत हुडकोकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने मनपाला दरमहा ३ कोटीचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे आयुक्त जीवन सोनवणे यांनी शुक्रवारी नगरविकास विभागाच्या सहसचिवांची भेट घेऊन त्यांना याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच शासन, मनपा व हुडकोच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली. त्यांनी दिवाळीनंतर अशी बैठक आयोजित करण्याचे मान्य केले.
गाळे प्रश्नाची घेतली माहिती
मनपाने शहरात बांधलेल्या व्यापारी संकुलांपैकी १८ मार्केटमधील गाळेधारकांची कराराची मुदत २०११-१२ मध्येच संपली आहे. त्याबाबत मनपाने अनेक वेळा करारासाठीचे ठराव करूनही कधी शासनाने तर कधी न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा विषय रखडला आहे. त्यातच मनपाने कराराची मुदत संपल्यावर रेडिरेकनरच्या दराने पाच पट दंडासह भाडे वसूल करण्याचा तसेच गाळ्यांच्या कराराबाबतचा ठराव क्र.४० ही शासनाने स्थगित केला आहे. त्यावर नगरविकास राज्यमंत्र्यांकडे दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. त्याअनुषंगाने स्थगिती उठविण्याच्या संदर्भात मनपाकडून सविस्तर माहिती सहसचिवांनी घेतली. आयुक्तांनी हा विषय रखडल्यामुळे मनपाची आर्थिकड कोंडी होत असल्याने विषय मार्गी लावण्याची मागणी केली.