शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

माणसांची राक्षसी भूक, देवभूमीचा खचला पाया

By shrimant mane | Published: January 15, 2023 9:25 AM

पर्यटन व पाण्यातून विजेची राक्षसी भूक

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, नागपूर: देवभूमीचा पाया खचला आहे. हिरण्यकश्यपू खांबातून निघाला होता, तसा जिथे आदिशंकराचार्यांनी तपश्चर्या केली, त्या पवित्र जोशीमठाच्या भूगर्भातून नवा राक्षस धरतीचे कवच फोडून बाहेर येऊ पाहतो आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली हिमालयाची चाळण केल्याने भूगर्भात प्रचंड आक्रंदन सुरू आहे आणि त्याची परिणती काय होईल, या भीतिदायक कल्पनेने पंचवीस हजार लोकसंख्येच्या छोट्याशा, पर्वताच्या उतारावर वसलेल्या जोशीमठाची, उत्तराखंडची, हिमालयीन पर्वतराजीची झोप उडाली आहे. 

जोशीमठातील खचलेल्या घरांवर लाल फुल्या मारणे, लोकांना इतरत्र हलविणे, धोकादायक हॉटेल्स व इमारती पाडणे सुरू आहे. बहुतेक ते गाव हलवावेच लागेल आणि या आपत्तीचे मुख्य कारण तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पात धरणाचे पाणी टर्बाईनपर्यंत नेणारा १२ किमी लांबीचा बोगदा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ किमीचा बोगदा खोदून झालाय. उरलेले चार किमी खोदताना टनेल बोअरिंग मशिन अडकली. ती बाहेर काढण्यासाठी ब्लास्ट केले. त्याने भूगर्भातील जलप्रवाह फुटले. पाणी वाहू लागले. त्या भुसभुशीत पोकळीत मलबा शिरला व वरची जमीन ढासळू लागली, असा काहीसा हा घटनाक्रम आहे. 

केवळ जोशीमठ किंवा चमोली जिल्हाच नव्हे, तर आयताकृती उत्तराखंड राज्यातील मधला आडवा टापू अस्वस्थ आहे. अतिउत्तरेकडील गंगोत्री व नंदादेवी हिमशिखरांच्या दोन प्रमुख समूहापैकी पूर्वेकडील, नेपाळ सीमेला लागून असलेले नंदादेवी ग्लेशियर्स नैसर्गिक आपत्तीप्रवण आहे. भूकंप, भूस्खलन, हिमस्खलन, हिमवादळे, ढगफुटी, महापूर अशा संकटांची मालिका हा भाग भोगतो आहे. जोशीमठासोबत केदारनाथ, बागेश्वर, चमोली, पिठोरगड, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी या भागांतील अनेक गावांमध्ये भूस्खलन होतेय. पक्क्या डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. बहुतेक ठिकाणी घराखालून भूगर्भातील पाण्याचे प्रवाह सुरू आहेत. हे तिथे घडतेय, ज्या परिसरात जलविद्युत प्रकल्पांसाठी बोगदे खणले जात आहेत,  पर्यटकांसाठी चांगले दहा मीटर रुंदीचे महामार्ग बांधले जात आहेत. झालेच तर उत्तराखंडच्या दक्षिणेकडील, उत्तर प्रदेश सीमेलगतचा हरिद्वार वगैरे मैदानी भाग उंचीवरच्या तीर्थस्थळांना जोडण्यासाठी रेल्वेमार्ग तयार होत आहेत. हा निसर्गाशी खेळ सुरू आहे. हा खेळ अतिसंवेदनशील हिमालयाच्या पर्यावरणाचा खंडोबा करील, अशी भीती आहे. 

उत्तराखंड ही सुरुवात आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हिमकवच लाभलेला वायव्येकडील हिंदुकुश पर्वतराजीपासून ते पूर्व, आग्नेयकडील म्यानमारपर्यंतचा अंदाजे २,४०० किमी लांबीचा संपूर्ण हिमालय पर्वतसमूह ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिणामांचा सामना करीत आहे. 

आपण संकटांचा योग्य तो धडा घेत नाही. आपत्तींमुळे आत्मपरीक्षण करीत नाही. निसर्ग ओरबाडणे थांबवत नाही, हेच खरे, अन्यथा अवघ्या दोन वर्षांपूर्वी चमोली, जाेशीमठ परिसरात नंदादेवी खोऱ्यातील हिमस्खलन व ढगफुटीमुळे झालेला प्रलय, दोनशेवर बळी, जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात शे-दीडशे जणांना जलसमाधी हे इतक्या लवकर विसरलाे नसतो. त्याही आधी २०१३ साली चार हजारांवर जीव घेणाऱ्या केदारनाथ, बद्रीनाथ परिसरातील हिमालयीन त्सुनामीचेही विस्मरण झाले नसते. निसर्गाच्या, पर्यावरणाच्या हाका विकासाच्या गोंगाटात विरून गेल्या नसत्या. १९९१ मधील उत्तरकाशी, १९९९ मधील चमोलीच्या भूकंपाने बेचिराख गावे पुन्हा तशाच आपत्तीच्या अक्राळविक्राळ जबड्यात ढकलायला सरसावलो नसतो.

पर्यटन व पाण्यातून विजेची राक्षसी भूक 

- पर्यटन उत्तराखंडच्या उत्पन्नाचा आधार. - सव्वाकोटी लोकसंख्येच्या उत्तराखंडमध्ये वर्षाला तीन कोटींहून अधिक पर्यटक. - पर्यटन विकासासाठी चांगले रस्ते, रेल्वे, बहुमजली हॉटेल्सची उभारणी - गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ व बद्रीनाथ या चार पवित्र ठिकाणांची, उत्तराखंडची छोटी चारधाम यात्रा करणारे अधिक - जलविद्युत निर्मिती हा उत्तराखंडच्या अर्थकारणाचा दुसरा मोठा स्रोत. २००० साली  राज्यनिर्मितीवेळीच २१ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट - साडेचार-पाच हजार मेगावॉट निर्मिती सुरू - उत्तराखंडमध्ये सरकारी, खासगी, व्यावसायिक मिळून तब्बल तीनशेच्या आसपास छोटेमोठे जलविद्युत प्रकल्प २०१३ च्याकेदारनाथ प्रलयानंतर सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड जलविद्युत निगमचे ७० पैकी ४४ प्रकल्प थांबविले. - वीस प्रकल्प पूर्ण, सहा प्रगतिपथावर. स्थगित ४४ प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न - भौगोलिक स्थिती व नद्यांचे प्रवाह जलविद्युत निर्मितीसाठी अत्यंत पोषक. - दरीच्या तोंडावर धरण बांधले की मुबलक जलसाठा - टिहरी धरण हे याचे चांगले उदाहरण. त्याची उंची २६० मीटर, तर लांबी अवघी ५७५ मीटर. जलसाठा ४२ किलोमीटरपर्यंत. - हे भारतातील सर्वाधिक व जगात बाराव्या क्रमांकाचे उंच धरण. - तब्बल २,४०० मेगावॉट म्हणजे देशातील सर्वाधिक क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाच्या वाटेवर

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड