Joshimath Landslide : जोशीमठ भूस्खलन; सैन्याच्या 25-28 इमारतींनाही तडे, जवानांना सुरक्षित ठिकाणी हलवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 02:38 PM2023-01-12T14:38:11+5:302023-01-12T14:41:11+5:30

Joshimath Landslide : गेल्या काही दिवसांपासून जोशीमठमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असून, शेकडो लोकांनी घरं खाली केली आहेत.

Joshimath Landslide : 25-28 army buildings were also cracked, personnel were shifted to safe places | Joshimath Landslide : जोशीमठ भूस्खलन; सैन्याच्या 25-28 इमारतींनाही तडे, जवानांना सुरक्षित ठिकाणी हलवले

Joshimath Landslide : जोशीमठ भूस्खलन; सैन्याच्या 25-28 इमारतींनाही तडे, जवानांना सुरक्षित ठिकाणी हलवले

googlenewsNext

Joshimath Landslide : उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये होत असलेल्या भूस्खलनाचा परिणाम भारतीय लष्कराच्या इमारतींवरही दिसून येत आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, लष्कराच्या सुमारे 25-28 इमारतींना तडे गेले आहेत. यामुळे जवानांना जोशीमठ येथून तात्पुरतं इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे. गरज भासल्यास लष्कराच्या जवानांना औली किंवा इतर ठिकाणीही पाठवलं जाईल, असेही ते म्हणाले.

जोशीमठमध्ये सैन्य मदतीसाठी पुढे आलं

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 15 जानेवारीला लष्कर दिनापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की, जोशीमठ ते माण या रस्त्याला तडे गेले आहेत. BRO याबाबत काम करत आहे, पण याचा परिचालन तयारीवर परिणाम झालेला नाही. LAC पासून जोशीमठ फक्त 100 किमी अंतरावर आहे. अशा स्थितीत हे क्षेत्र सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. अशा परिस्थितीत जोशीमठमध्ये लष्कर आणि आयटीबीपीचे जवान तैनात असतात. एवढंच नाही तर स्थानिक लोकांच्या मदतीसाठी लष्करही पुढे आल्याचं मनोज पांडे यांनी सांगितलंय. लष्करानं नागरी प्रशासनाला रुग्णालये, हेलिपॅडही दिले आहेत.

जोशीमठमधील 723 घरांना तडे
जोशीमठमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत 723 घरांना तडे गेले आहेत. एवढंच नाही, तर अनेक ठिकाणी रस्त्यांनाही भेगा पडल्या आहेत. जमिनीतूनही पाणी वाहत आहे. ज्या घरांना तडे आहेत, त्या घरांवर लाल रंगाचे निशाण लावण्यात आलं आहे. लोकांना घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत सुमारे 150 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. लोकांना दीड लाख रुपयांची अंतरिम मदतही जाहीर झाली आहे. त्यांना त्यांच्या मालमत्तेची बाजारभावानुसार भरपाईही दिली जाईल, असं सरकारचं म्हणणं आहे.

खराब हवामानामुळे चिंता वाढली
जोशीमठमधील हवामान सतत खराब होत आहे. पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांपासून प्रशासनापर्यंत सर्वांचीच चिंता वाढली आहे. बुधवारी झालेल्या पावसानंतर आणखी घरांना तडे गेल्याचंही सांगण्यात येत आहे. तर ज्या घरांना अगोदरच भेगा होत्या, त्या आणखी वाढल्या आहेत.

सीएम धामी यांनी जोशीमठला भेट दिली
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी जोशीमठच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तत्पूर्वी बुधवारी रात्री सीएम धामी यांनी बाधित घरांना आणि मदत शिबिरांना भेट दिली. त्यांनी पीडित कुटुंबीयांशीही संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. 

Web Title: Joshimath Landslide : 25-28 army buildings were also cracked, personnel were shifted to safe places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.