शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

चिंताजनक! अवघ्या १२ दिवसांत ५.४ सेमी जमीन खचली; ISRO नं जारी केली सॅटेलाईट ईमेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 3:17 PM

एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान जमीन खचण्याचं प्रमाण खूपच कमी होते. यादरम्यान जोशीमठ नऊ सेंटीमीटर खचला होता.

नवी दिल्ली - जोशीमठाबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) धक्कादायक खुलासा केला आहे. इस्रोच्या अहवालानुसार, जोशीमठमध्ये अवघ्या १२ दिवसांत ५.४ सेमी जमीन खचली आहे. इस्रोने जोशीमठची सॅटेलाईट ईमेज देखील प्रसिद्ध केली आहे, त्यानुसार २७ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान जोशीमठची जमीन ५.४ सेंटीमीटरने खचल्याचं दिसून येत आहे. या घटनेची सुरुवात २ जानेवारी २०२२ रोजी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

इस्रोने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान जमीन खचण्याचं प्रमाण खूपच कमी होते. यादरम्यान जोशीमठ नऊ सेंटीमीटर खचला होता. सबसिडेन्सचा मुकुट जोशीमठ-औली रस्त्याजवळ २१८० मीटर उंचीवर आहे. जमीन खचल्याने जोशीमठ-औली रस्ताही खचणार असल्याची माहिती समोर आली आहे. कार्टोसॅट-2एस उपग्रहाने टिपलेल्या फोटोंमध्ये इस्रोने जोशीमठमधील लष्करी हेलिपॅड आणि नरसिंह मंदिरासह संपूर्ण शहराला संवेदनशील क्षेत्र म्हणून चिन्हांकित केले आहे.

जोशीमठ दरवर्षी २.६० इंचानं खचतोय इस्रो व्यतिरिक्त, इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS) ने देखील सरकारला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार जोशीमठ दरवर्षी ६,६२ सेमी म्हणजेच सुमारे २.६० इंच खचत आहे. आयआयआरएसने सुमारे दोन वर्षे सॅटेलाईट ईमेजचा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल तयार केला आहे. IIRS डेहराडूनच्या शास्त्रज्ञांनी जुलै २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत जोशीमठ आणि आसपासच्या सुमारे सहा किलोमीटरच्या सॅटेलाईट ईमेजची स्टडी केली. 

जोशीमठमध्ये भूवैज्ञानिक बदल जोशीमठ आणि आसपासच्या परिसरात होत असलेले भूवैज्ञानिक बदल अहवालात दिसले. नुकताच आयआयआरएसने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये जोशीमठला दरवर्षी ६.६२ सें.मी.च्या अंकाने खाली खचत आहे. त्याचे सॅटेलाईट फोटोही प्रसिद्ध झाले आहे. तसेच, IIRS ने एक व्हिडिओ जारी केला आहे, जो जोशीमठचे 3-D बदल दर्शविले आहेत. 

केवळ जोशीमठच नाही तर संपूर्ण खोऱ्यात भूस्खलनाच्या घटना आयआयआरएसने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हे देखील दिसून आले आहे की भूस्खलन केवळ जोशीमठ शहरात होत नाही. संपूर्ण खोरे त्याच्या जाळ्यात आहे. त्याचे घातक परिणाम येत्या काळात दिसू शकतात असा इशारा दिला आहे. 

टॅग्स :isroइस्रो